मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हल्लेखोरांना अखेर अटक

मुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश रत्नागिरी पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे मुंबई विद्यापीठाचेच कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमीने केलेल्या पोलीस तक्रारीमुळे हा सगळा प्रकार उघड झाला आहे. १ लाख ३५ हजार रुपयांच्या बदल्यात या ठोळीने विद्यार्थ्याला दोन विषयात उत्तीर्ण केले असल्याचे उघड झाले आहे.

काय आहे प्रकरण?

रत्नागिरीच्या फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये एक विद्यार्थी द्वितीय वर्षात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत होता. प्रवेशावेळी त्याने दाखवलेल्या प्रमाणपत्रावर अॅकॅडमीच्या व्यस्थापनाला संशय आला. व्यवस्थापनाने प्रमाणपत्राला पडताळणीसाठी मुंबई विद्यापीठात पाठवले. मुंबई विद्यापीठाने हे प्रमाणपत्र विद्यापीठाचे नसल्याचे पडताळणीत सांगितले. ते प्रमाणपत्र हुबेहुब मुंबई विद्यापीठाच्या प्रमाणपत्रासारखे होते. याप्रकरणी फिनोलेक्स अॅकॅडमीने रत्नागरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुरु केलेल्या तपासणीत महाविद्यालयाच्या शिपाईपासून ते विद्यापीठात काम करणारे कर्माचारींचा हात असल्याचे समोर आले.

पोलिसांनी कुणाकुणाला ठोकल्या बेड्या?

याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी मुंबई विद्यापीठाचे डेटा एन्ट्री ऑपरेटर गोरखनाथ गायकवाड, महेश बागवे, विद्यापीठाचे क्लार्क गणेश गंगाराम मुणगेकर आणि शिपाई प्रवीण वारीक यांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा – २० हजार शार्क माशांची सेक्ससंबंधित औषध तयार करण्यासाठी कत्तल

केटामिनचे उत्पादन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त
First Published on: October 14, 2018 3:49 PM
Exit mobile version