घरमुंबई२० हजार शार्क माशांची सेक्ससंबंधित औषध तयार करण्यासाठी कत्तल

२० हजार शार्क माशांची सेक्ससंबंधित औषध तयार करण्यासाठी कत्तल

Subscribe

सेक्स पॉवर वाढवणारं औषध बनवण्यासाठी 20 हजार शार्कची कत्तल करण्यात आली. याप्रकरणी डीआरआईने अटक केलेल्या ४ आरोपींना कोर्टाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भारतीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली आहे. मुंबई डीआरआईने शार्क माशांच्या कल्ल्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी मुंबई आणि गुजरातसह अनेक शहरातील समुद्रामध्ये शार्क माशांच्या कल्ल्यांना काढून त्याची विदेशात विक्री करत होते. याप्रकरणी डीआरआईने ८००० किलो शार्क माशांच्या कल्ल्यांना जप्त केले आहे. ३००० किलो शार्क माशांचे कल्ले मुंबईतील शिवडी येथील गोदामातून तर ५००० किलो कल्ले गुजरातमधील वेरावर येथून जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी

हे चारही आरोपी शार्क माशांचे कल्ले काढून घ्यायचे त्यानंतर त्या शार्कला पुन्हा समुद्रात सोडून देत होते. मात्र समुद्रात सोडल्यानंतर त्यांना पंख आणि कल्ले नसल्याने पोहता येत नसल्याने त्यांचा मत्यू व्हायचा. डीआरआईने मुंबईतील आरोपींच्या गोडाऊनमधून जवळपास ४० कोटींचे शार्क माशांचे कल्ले जप्त केले. या कल्ल्यांना आरोपी चीन, हॉगकॉगसोबत इतर देशामध्ये तस्करी करायचे. शार्क माशांना पाळणे आणि त्यांची विक्री करणे भारतामध्ये बेकायदेशीर आहे. आरोपींना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सेक्सच्या संबंधित औषध तयार केले जाते

शार्क माशांच्या कल्ल्यांना सर्वात जास्त मागणी चीन, जपान आणि हॉगकॉगमध्ये आहे. ज्याठिकाणी शार्क माशांच्या कल्ल्याच्या सूपला मोठी मागणी आहे. या देशांमध्ये एक कप शार्पच्या कल्ल्यांच्या सूपाची किंमत १०० ते ५०० डॉलर ऐवढी आहे. या व्यतिरिक्त शार्कच्या कल्ल्यांचा वापर सेक्सच्या संबंधित औषध तयार करण्यात केला जातो.

- Advertisement -

२० हजार शार्कची कत्तल

सगळ्या देशामध्ये शार्कच्या बचावासाठी शार्कच्या शिकारीला बंदी आणली आहे. शार्कच्या घटणाऱ्या संख्येची दखल घेत याची मासेमारी करण्यास आणि निर्यात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र मोठ्या कामाईसाठी शार्कची तस्करी केली जाते. आरोपींनी आतापर्यंत २० हजार शार्कची कत्तल केली आहे. शार्कची शिकार करुन आठ हजार किलो कल्ले जमा करण्यात आले होते. या आरोपींच्या चौकशीमधून आणखी मोठी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -