बेस्ट प्रवाशांसाठी ‘ई – बाईक सेवा’; अंधेरीत प्रयोग यशस्वी

बेस्ट प्रवाशांसाठी ‘ई – बाईक सेवा’; अंधेरीत प्रयोग यशस्वी

बेस्ट उपक्रम कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असताना वीज ग्राहक व बेस्ट बस प्रवाशांना डिजिटल सेवा उपलब्ध करीत आहे. बेस्ट परिवहन विभागाने प्रवाशांसाठी अंधेरी (पूर्व) येथे वोगो कंपनीच्या माध्यमातून ‘ ई – बाईक सेवा’ उपलब्ध करण्याबाबत केलेल्या प्रोयोगाला यश आले आहे. त्यामुळे आता बेस्टकडून मुंबईत इतरत्र लवकरच ‘ई – बाईक सेवा’ बेस्ट उपक्रमाच्या चलो अँपवर लवकरच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. (E Bike Service for Best Passengers)

बेस्ट उपक्रमाने मुंबईतील प्रवाशांना बेस्ट वाहतूक सेवा देण्यासाठी ‘ई – बाईक सेवा’ सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी भारतात प्रथमच बेस्टने वोगो या कंपनीकडून सहकार्य घेतले. अंधेरी ( पूर्व) भागात बेस्ट बस थांब्यावर ‘ई -बाईक सेवा’ प्रयोगिक तत्वावर सुरू करण्यात आली.

प्रवासी बसमधून उतरल्यावर प्रवाशास जाण्यासाठी ‘ई – बाईक सेवा’ उपयुक्त ठरणार आहे. ‘ई – बाईक’ चा वेग प्रती तास २० किलोमीटर असल्याने अपघात होण्याची शक्यता कमी आहे, असा बेस्टचा दावा आहे.

या ठिकाणी उपलब्ध सेवा


हेही वाचा – मुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात; तलावांत फक्त १० टक्के पाणीसाठा शिल्लक

First Published on: June 24, 2022 10:04 PM
Exit mobile version