राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली आहे. आज सकाळी 6.30 च्या सुमारास ईडीचे 20 अधिकारी मुश्रीफांच्या कोल्हापूरातील कागलमधील घरी पोहचले आहेत.

कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी ईडीने ही छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली मुश्रीफ यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. दरम्यान त्यांच्या घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केवळ ईडीच नाही तर आयकर विभागानेही तपासणी सुरु केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांविरोधात कारवाईची मागणी केली होती. दरम्यान 2019 मध्येही हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर, साखर कारखान्यावर ईडीने छापेमारी केली होती. त्याचवेळी पुण्यातील घराचीही ईडीने झडती घेतली होती. सोबत मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती.

दरम्यान मुश्रीफांविरोधातील या कारवाईनंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. मुश्रीफांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर जमा होत सरकारविरोधात, तपास यंत्रणांविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे.


आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत


 

First Published on: January 11, 2023 9:30 AM
Exit mobile version