घरमहाराष्ट्रआमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

Subscribe

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या अपघाताची घटना समोर आली आहे. रस्ता क्रॉस करताना एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली, या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारांसाठी अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे त्यांचा डोक्याला चार टाके पडले आहेत. आज सकाळी 6. 30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. खुद्द बच्चू कडू यांनी आता ट्विट करत आपल्या अपघाताची माहिती दिली आहे.

बच्चू कडू यांनी ट्विट करत प्रकृती ठीक असल्याचं म्हणत विश्रांती घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यासह त्यांनी कोणीही हितचिंतकांना भेटण्यासाठी न येण्याचं आवाहन केलंं आहे.

बच्चू कडू यांच ट्विट 

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 6. 30 च्या सुमारास बच्चू कडू रस्ता क्रॉस करत होते. त्या सुमारास समोरून येणाऱ्या एका दुचारीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली, यामुळे बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर जाऊन आदळले यात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -