दिवाळीनंतर खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

दिवाळीनंतर खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

दिवाळीनंतर खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. कोरोनाच्या संकटात लोकांवर आर्थिक संकट कोसळले. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. त्यात आता दिवाळीनंतर तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीनंतर तेलाचे दर १६० रूपये प्रति किलोवर जाण्याची शक्यता आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानव प्राधिकरणाद्वारे (FSSAI) केंद्र सरकेरने १ ऑक्टोबरपासून मोहरीच्या तेलात केल्या जाणाऱ्या भेसळीवर बंदी घातली. त्यामुळे व्यापाऱ्यांना आता शुद्ध मोहरीच्या तेलाची विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. या बंदीमुळे आता फायदा होत नसल्याने व्यावसायिकांकडून तेलाच्या दरात वाढ करण्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय बाजारात तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलाच्या दरात २५-३० टक्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सरकारने पाम तेलाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता पाम तेलाच्या आयातीवर १४ टक्क्यांनी घट झाली आहे. खाण्याच्या तेलातही मागील वर्षांपासून वाढ झालेली पहायला मिळत आहे.

२०१९ मधील खाद्यतेलाचे भाव
शेंगदाणा तेल १४० प्रति किलो होते. यंदा हे भाव १६२ रूपयांवर पोहचले आहेत.
तिळाचे तेल १२० प्रति किलो होते. यंदा हे भाव १६० रूपयांवर पोहचले आहेत.
सोयाबिन तेल ८९ प्रति किलो होते. आता हे भाव १०३ रूपयांवर पोहचले आहेत.
पाम ऑईल ६७ प्रति किलो होते. आता हे भाव ९८ रूपये झाले आहे.

ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यत तिळाच्या तेलात १५ ते २० रूपयांची वाढ झाली आहे. दिवाळीनंतर या तेलांच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. यावर्षी मोहरीचे कमी उत्पादन झाले त्याचबरोबर ब्लेडिंग आणि तेलासाठी परराष्ट्र धोरणात झालेल्या परिणामुळे हे बदल झाले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – अयोध्येत ६ लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा;‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नोंद!

First Published on: November 14, 2020 1:16 PM
Exit mobile version