वीज बिल वसुलीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नितीन राऊतांचा इशारा

वीज बिल वसुलीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नितीन राऊतांचा इशारा

वीज बिलाच्या वसुलीला हिंसक विरोध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. महावितरणची थकबाकी हे भाजपचे पाप असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे अधिक्षक अभियंता शेख यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचा निषेध करत डॉ. राऊत यांनी शनिवारी प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात वीज ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.

प्रचंड थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात सापडली असून ग्राहकांनी वीज बिल भरून या कंपनीला संकटातून बाहेर काढावे. भाजप नेत्यांनी कायदा हाती घेऊन महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांना मारहाण करणे वा त्यांच्या विज बिल वसुलीच्या कामात अडथळे निर्माण करणे हे चुकीचे कृत्य असून असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ.राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात भाजपची सत्ता असताना त्यांनी हेतूपुरस्सरपणे केलेल्या गैरव्यवस्थापनामुळे आज महावितरणवर थकबाकीचा डोंगर उभा राहिल्याचा आरोपही डॉ. राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा – ऊर्जामंत्र्यांनी घरात लावलेले दिवे पहाच, नितीन राऊतांच्या बंगला, कार्यालयाचा फर्स्ट लुक !


 

First Published on: March 27, 2021 10:53 PM
Exit mobile version