घरताज्या घडामोडीऊर्जामंत्र्यांनी घरात लावलेले दिवे पहाच, नितीन राऊतांच्या बंगला, कार्यालयाचा फर्स्ट लुक !

ऊर्जामंत्र्यांनी घरात लावलेले दिवे पहाच, नितीन राऊतांच्या बंगला, कार्यालयाचा फर्स्ट लुक !

Subscribe

संपुर्ण राज्यभरात वीज कंपन्यांविरोधात वीज ग्राहकांचा आक्रोश असतानाच राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर आणि सरकारी कार्यालयावर झालेल्या खर्चाचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. सरकारकडे पैसे नाही म्हणतात, गरीब शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापतात, कोरोना योध्यांना पगार देत नाही, मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सरकारी ऑफिस व बंगल्यावर जाऊन पहा कसे पैसे उधळतात ! असा मॅसेजही या फोटोंसोबत व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विमान प्रवासावर आक्षेप घेतला होता. त्यावेळीही सरकारी खर्चाने खासगी प्रवास करण्याचा मुद्दा भाजपकडून लावून धरण्यात आला होता.

nitin raut

- Advertisement -

राज्यात महावितरण वीज थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकांविरोधात वीज पुरवठा खंडित करण्याची वीज तोडणीची मोहीम राबवत आहे. अशातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आपल्या बंगल्यावर आणि सरकारी कार्यालयात खर्च केलेल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. ऊर्जा मंत्र्यांच्या शासकीय कार्यलायवर झालेला खर्च तसेच बंगल्यावर झालेला खर्च दाखवण्याचा प्रयत्न या फोटोमधून करण्यात आला आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनी अडणचणीत आली आहे, त्यामुळेच वीजबिल भरणे गरजेचे असल्याचे नितीन राऊत यांनी जनतेला आवाहन केले होते. पण त्याचवेळी त्यांच्या बंगल्यावर आणि शासकीय कार्यालयावर झालेला खर्च हा अवाढव्य अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळेच सर्वसामान्य ग्राहक एकीकडे अडचणीत असतानाच इतक्या आलिशान पद्धतीच्या सेवा सुविधांसाठी नेमका कसा पैसा खर्च करण्यात येतो असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.

nitin raut

- Advertisement -

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरामध्ये सोफोसेटपासून ते नवीन टेलिव्हीजन, आसन व्यवस्था यासोबतच मोठ्या प्रमाणात झालेल्या रोषणाच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासोबतच नव्या कारपेटपासून ते एसीची नवीन यंत्रणा यासारख्या फोटोंमुळे नितीन राऊत यांचा बंगला आणि शासकीय कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे नितीन राऊत यांचा बंगला आणि शासकीय कार्यालय हे वादाचा विषय ठरत आहे.

खासगी प्रवासासाठी सरकारी खर्च

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत लॉकडाऊन काळात बेकायदा पद्धतीने खासगी कामासाठी विमान प्रवास केल्याचे उघड झाले असल्याने मुख्यमंत्र्यांनी राऊत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपा चे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व ऊर्जा विभागाचे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली होती. सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406,409 अन्वये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी करणारा अर्ज आपण वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल केल्याचेही पाठक यांनी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. पाठक बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -