कोट्यवधीच कर्ज; मात्र सुसाईड नोट लिहून कुटुंब बेपत्ता

कोट्यवधीच कर्ज; मात्र सुसाईड नोट लिहून कुटुंब बेपत्ता

बेपत्ता कुटुंब

कर्जबाजारी झाल्याने पिंपरी चिंचवडमधील एक कुटुंब सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाले आहे. चिंचवडच्या मोहननगर येथे हे कुटुंब राहायला आहे. ५ डिसेंबरपासून आई-वडील आणि दोन्ही मुलं घर सोडून आत्महत्या करतो, असं चिट्ठीत नमूद करून बेपत्ता झाले आहेत. संतोष शिंदे, सविता शिंदे असं दाम्पत्यांचं तर मुकुंद शिंदे आणि मैथली शिंदे अशी मुलांची नावं आहेत. दोन ते अडीच कोटींचे अंगावर कर्ज असून ते ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतात. यांच्याच मालकीच्या तीन मजली इमारतीत हे तिघे भाऊ राहतात.

मालमत्ता जप्तीच्या भीतीने पलायन

संतोष गेल्या काही महिन्यांपासून कर्जाची हफ्ते भरू शकले नव्हते. बँकांनी मात्र ससेमिरा सुरू ठेवला होता. आता बँक मालमत्ता जप्त करणार हे लक्षात आल्याने ते सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेत. अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. सुसाईड नोट मध्ये “कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार असल्याने अन्य कोणाला दोषी धरू नये. मी स्वतःच घर सोडून निघून चाललो आहे. आम्ही चौघे ही आत्महत्या करणार आहोत, हा आमचा सर्वस्वी निर्णय आहे”, असं नमूद करण्यात आलं आहे. ५ डिसेंबरला अशी चिट्ठी लिहून चौघे बेपत्ता झालेत. ६ डिसेंबर ला पोलिसांना याची कल्पना संतोष यांच्या भावाने दिली. संतोष शिंदे यांना दोन भाऊ आहेत. त्यापैकी एक त्यांच्यासोबत ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय तर दुसरा नोकरी करतो. त्यांच्यासोबत बेपत्ता झालेला मुलगा हा मेकॅनिकल इंजिनियरिंगच शिक्षण घेत आहे. या चौघांनी मोबाईल घरीच ठेवून गेल्याने पिंपरी पोलिसांना त्यांचा अध्याप ही थांगपत्ता लागलेला नाही.

घराची झडती घेतल्यावर प्रकार उडकीस

डिसेंबरला त्यांच्या चालकाने चौघांना चिंचवड रेल्वे स्टेशनवर सोडले. तेव्हापासून त्यांना संपर्क साधता आला नाही. फोन का उचलत नाहीत, म्हणून भावाने घराची झडती घेतली. घरात चौघांचे मोबाईल, सुसाईड नोट आणि कपाटाच्या चाव्या दिसल्या. तेव्हा हा प्रकार समोर आला.

First Published on: December 20, 2018 11:19 AM
Exit mobile version