नांदेड – किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

नांदेड – किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

प्रातिनिधक छायाचित्र

नांदेड – नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि आयशरच्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, पाचजण गंभीर जखमी आहेत.त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोचा चक्काचूर झाला असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

हेही वाचा – वाढते अपघात टाळण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; आता कारच्या प्रत्येक सीटसाठी सीट बेल्ट अलार्म बंधनकारक

रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू असून येथे बिहारचे मजूर काम करत आहेत. हिमायतनगर परिसरात काम करून झाल्यावर हे मजूर टेम्पोतून विद्यूत लाईनचं साहित्य घेऊन भोकर येथे जात होते. यावेळी नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारी फाटा येथे आयशर टेम्पोला (वाहन क्रमांक एमएच -२६ जे ००१६) भरधाव वेगातील सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच- २६ बीई १०११) जबर धडक दिली. या अपघातात चार मजूर, एक चालक यांचा जागीच मृत्यू झाला तर, पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे.

हेही वाचा – LPG टँकरचा भीषण अपघात; मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेवरील पाली ते लांजा मार्ग रात्रभर वाहतुकीसाठी बंद

First Published on: September 25, 2022 10:09 AM
Exit mobile version