‘त्या’ दोघांनी वडिलांची हत्या करण्यासाठी ‘फादर्स डे’ हा दिवस निवडला!

‘त्या’ दोघांनी वडिलांची हत्या करण्यासाठी ‘फादर्स डे’ हा दिवस निवडला!

Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river

काल सगळीकडे फादर्स डे साजरा झाला. पण या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. फादर्स डे दिवशी मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खुन केला आहे. ही संतापजनक घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात घडली. तर चाकुर तालुक्यातही अशीच काहीशी घटना घडली आहे. दोन पित्याच्या क्रूर हत्येनं अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

या दोन्ही घटनेत कारण मात्र सारखेच आहे. शेतीच्या वादातून या हत्या करण्यात आल्या आहेत. या घटनेत चारजणं जखमी देखील झाले आहेत. शेतीच्या किरकोळ वादातून भोसलेवाडीत ही घटना घडली आहे. तर फादर्स डेच्या दिवशी लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याच समोर आलं आहे.

शेतीच्या वादातून चाकूर इथल्या माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत मारापल्ले यांचा मुलानेच प्रॉपर्टीसाठी खून केला. याप्रकारनात चाकूर पोलिसांनी मुलास अटक केली आहे.

निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. त्यांनी पेरणी सुरू केली. यावरून मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू का केली याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याचं वडिलांशी भांडणं झालं.या वादात नागनाथ याची मुलं-बायको आणि मेव्हणे यांनी ही साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने पित्याला जबर मारहाण केली आणि यात पंचप्पा यांचा मृत्यू झाला. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या चार जणांनाही जबर मार बसला असून जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर घटनेतील सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.


हे ही वाचा – कोरोना ही शेवटची महामारी नाही, यानंतर अनेक संकट वाट पहात आहेत –  WHO


 

First Published on: June 22, 2020 9:15 AM
Exit mobile version