घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना ही शेवटची महामारी नाही, यानंतर अनेक संकट वाट पहात आहेत -...

कोरोना ही शेवटची महामारी नाही, यानंतर अनेक संकट वाट पहात आहेत –  WHO

Subscribe

या महामारी नंतर जगाला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.

केवळ देश नाही तर संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे. गेले काही महिने शास्त्रज्ञ कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण कोरोना हे काही शेवटचं संकट नाही. तर या महामारी नंतर जगाला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.

न्यूज १८ शी बोलताना सौम्य स्वामिनाथन यांनी सावधानतेचा इशारा दिला. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या या परिस्थिती इतर आजारांकडे होणारं दुर्लक्ष, अत्यावश्यक आरोग्य सेवांवर होणारं परिणाम आणि त्याचे भविष्यात होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष वेधलं आहे, त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आम्ही ८० देशांचा सर्व्हे केला. यावेळी काही देशांकडे अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची योजना होती. त्यांच्याकडे सर्व यादीही तयार होती. पण फक्त ३५ टक्के देशांकडे याबबात कोणतीच उपाययोजना नव्हती.

- Advertisement -

इतर लसींवर परिणाम

“कोरोनाच्या परिस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. जवळपास ८०टक्के देशांमधील लसीकरण अंशतः किंवा पूर्णपणे ठप्प झालं आहे. हे खूप गंभीर आहे. त्यामुळे गोवरसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. जो मोठ्या झपाट्याने पसरू शकतो. त्याचप्रमाणे भारत आणि इतर देशांमध्येही टीबीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर आहेत कारण लोकं चाचणीसाठी क्लिनिकमध्ये येऊ शकत नाहीत. हृदयासंबंधी आजार, स्ट्रोक, टीबी अशा रुग्णांना त्यांना गरज असलेल्या सेवा वेळेत मिळत नाही आहेत. लॉकडाऊन आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा कमी होणं याचा दीर्घकालीन परिणाम होईल.

महासाथी एक संधी म्हणून बघूयात

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, “कोरोनासारख्या महासाथीने आव्हानांसह संधीही दिली आहे. आपली आरोग्य प्रणाली मजबूत करण्याची संधी. ज्यामुळे आपण या महासाथीतून आपोआप बाहेर येऊ आणि पुढील महासाथीपासूनही बचाव करू. असे व्हायरल आजार पुन्हा पुन्हा येत राहतील यात शंका नाहीच. आपण पाहत असलेलो ही शेवटची महासाथ नाही” जेव्हा ही परिस्थीती पुर्ववत होईल. तेव्हा लसीकरण, माता आणि बालकांसाठी आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य, कॅन्सरसारखे असंसर्गजन्य आजारांकडे तातडीने लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – पुण्यात कोरोना रूग्ण संख्या वेगाने वाढतेय, धक्कादायक आकडेवारी आली समोर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -