धनगर संघटनांच्या तक्रारीनंतर गोपीचंद पडळकरांवर कर्जतमध्ये गुन्हा दाखल

धनगर संघटनांच्या तक्रारीनंतर गोपीचंद पडळकरांवर कर्जतमध्ये गुन्हा दाखल

मंगळवारी अहिल्यादेवी होळकारांच्या जयंती दिनी कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) पोलिसांनी चौंडीकडे जाताना अडवले होते. यानंतर राजकीय वादाची ठिणगी पडली होती. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सडकडून टीका केली. तर राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे, अशी टीका भाजपने केली होती. यानंतर काही धनगर संघटनांच्या (Dhangar organization) तक्रारीनंतर गोपिचंद पडळकरांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पडळकरांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा – गोपीचंद पडळकर समर्थक अन् पोलिसात खडाजंगी 

यामुळे गुन्हा दाखल- 

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्या चौडीतील भाषणानंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रविंद्र पांडुळे यांनी तक्रार दिली आहे.

गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका –

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीसाठी मंगळवारी अनेक नेते चौंडीयेथे दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. रोहित पवारांना अतात कशा अहिल्यादेवी आठवल्या, रोहित पवार काय अहिल्यादेवींचे वंशज आहेत का? असा प्रश्न पडळकरांनी विचारला होता. मात्र, मंगळवारी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीला जाताना पोलिसांनी अडवले आणि हा राजकीय वाद पेटला.

हेही वाचा – जे देव-धर्म मानत नाहीत त्यांच्या हस्ते स्मारकाचं अनावरण कसं होईल?, गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला

पोलीसांवर आरोप –

पोलिसांनी अडवल्यानंतर पडळकर आणि खोत आक्रमक झाले होते. त्यांनी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. रोहित पवारांना कार्यक्रम घ्यायला परवानगी मिळते मात्र, आम्हाला तिथे जातानाही आडवले जाते. हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न पडळकरांनी विचारला होता. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर शरद पवारांना टार्गेट केले होते. त्यानंतर आज धनगर संघटना गोपीचंद पडळकरां विरोधात आक्रमक झाल्या दिसत आहे.

First Published on: June 1, 2022 6:15 PM
Exit mobile version