पुण्यात गॅसची पाईपलाईन फुटली, 12 वाजता लागलेल्या आगीवर पहाटे नियंत्रण

पुण्यात गॅसची पाईपलाईन फुटली, 12 वाजता लागलेल्या आगीवर पहाटे नियंत्रण

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील दांडेकर पुलाजवळ गॅस पाईपलाईन फुटल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली. MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याती घटना रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. गॅस पाईपलाईन फुटल्याने जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निश्मन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तसेच, शर्तीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. (fire breaks out at gas pipeline in pune)

मिळालेल्या माहितीनुसार, MNGL पाइपलाइनचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि या स्फोटातून आगीचे मोठे लोळ बाहेर आले. या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे इथून वाहतूक वळवण्यात आली होती. अखेर पहाडे चार वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या. आग लागली त्यावेळी एमएनजीएलचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची लाइन लीक झाली आणि हा स्फोट झाला. त्यामुळे पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय, या आगीची तिव्रता लक्षात घेता ही आग वस्ती असलेल्या भागांत नाही लागली, यामध्येच मोठे संकट टळले. अन्यता गंभीर झाले असते, असेही बोलले जात आहे. जोपर्यंत पाईपलाईनमध्ये गॅस शिल्लक आहे तोवर आग सुरू राहणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच पुण्यातील नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. या भागात अनेक लहान लहान औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या जवळ असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला आग लागली आहे.


हेही वाचा – विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी ‘या’ दोन दिवशी जाणार संपावर

First Published on: January 13, 2023 9:07 AM
Exit mobile version