भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजभवनात! सत्तासंघर्षाबद्दल राज्यपालांना काय ‘धडे’ देणार?

भगतसिंह कोश्यारी पुन्हा राजभवनात! सत्तासंघर्षाबद्दल राज्यपालांना काय ‘धडे’ देणार?

Koshyari’s visit to Mumbai मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) मुंबई दौऱ्यावर आहेत. ते तब्बल सहा दिवस राजभवनात मुक्कामी असणार आहे. नुकताच सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोश्यारींच्या भूमिकेवर न्यायलयाने कडक ताशेरे ओढले. आता १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. त्यामुळे कोश्यारींचा मुंबई दौरा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेले राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची ओळख आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर कोश्यारींनी राज्यपाल पदातून मुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती. मात्र त्याआधी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताना त्यांनी घेतलेले निर्णय हे घटनाबाह्य असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालने ओढले. ११ मे रोजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड (Chief Justice D.Y. Chandrachud) यांनी सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे सरकार कायम राहाणार असल्याचे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिंदे गटाचे १६ आमदार निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी आज ते विधीमंडळात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.
कोश्यारी राज्यपाल असताना त्यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. असे आदेश देण्याचा राज्यपालांना अधिकार नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने कोश्यारींना फटकारले. राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांच्या पलिकडे जाऊन घेतलेला तो निर्णय असल्याचे कोर्टाने म्हटले. तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सत्तास्थापनेचं दिलेलं निमंत्रणही कोर्टाने घटनाबाह्य असल्याचं निकालात स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोश्यारी प्रथमच राजभवनात येत आहेत. राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar)  यांना ते सहा दिवसांच्या मुक्कामात कोणते धडे देणार याची राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे. कारण १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय (Decision on disqualification of 16 MLAs) घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने दिले आहेत.
१७ ते २० मे दरम्यान कोश्यारी मुंबईत असणार आहेत.

हेही वाचा : सत्तासंघर्ष निकालात उद्धव ठाकरेंना धक्का नाही तर घटनात्मक कवच; CJI चंद्रचूड यांनी क्रिस्टल क्लिअर केलेला ‘न्याय’

First Published on: May 16, 2023 1:48 PM
Exit mobile version