ही तीन वर्षे कायम लक्षात राहतील, जखम हृदयावर आहे; जितेंद्र आव्हाड यांचं भावनिक ट्विट

ही तीन वर्षे कायम लक्षात राहतील, जखम हृदयावर आहे; जितेंद्र आव्हाड यांचं भावनिक ट्विट

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड राजकीय वर्तुळात एक चर्चेचा चेहरा आहेत. यात २०२२ या वर्षात जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटावरून सुरु असलेल्या गोंधळामुळे, प्रेक्षकांना केलेल्या मारहाणीमुळे चांगलेच वादात सापडले होत हे प्रकरण शांत होत नाही तोवर एक महिलेने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटकही झाली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यामुळे 2022 हे वर्ष जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय प्रतिमेला कुठेतरी धक्का लावणारेच ठरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशात 2023 या नववर्षाच्या पहिल्या दिवशी आव्हाडांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. जी पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. 1997, 2017, 2022 ही तीन वर्ष कायमची लक्षात राहतील म्हणत त्यांनी या तीन वर्षात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही वाईट घडामोडींच्या आठवणी सांगितल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट नेमकी काय?

1997 … आई सोडून गेली, 2017…बाबा सोडून गेले, 2022…पोलिसांनी राजकीय दबावापोटी खोटी विनयभंगाची तक्रार केली, ही तीन वर्ष कायमची लक्षात राहतील, जखम हृदयावर आहे, आता ह्यानंतर किती ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल काही सांगता येत नाही, सत्य परेशान हो सक्ता हैं । पराजीत नही।, अशी भावनिक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

साल 1997 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आईचे निधन झाले, तर 2017 मध्ये त्यांच्या वडीलांचे निधन झाले. आई आणि वडिलांच्या निधनामुळे आव्हाड आधीच खचले होते. त्यामुळे हे दोन वर्षे त्यांच्या आयुष्यात ह्रदयावर जखम करुन जाणारी ठरली. यानंतर 2022 हे वर्षे आव्हाडांच्या राजकीय कारकिर्दीला ठेच पोहचवणारे ठरले. जितेंद्र आव्हाड यांनी नोव्हेंबर २०२२ रोजी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेत, ठाण्यातील एका मॉलमध्ये सुरु असलेला चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी आव्हाडांवर प्रेक्षकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला, ज्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला. मात्र हे प्रकरण शांत होत नाही आव्हाडांविरोधात भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याकडून विनयभंगाचा आरोप करण्यात आला. मुंब्रा पोलीस ठाण्यात हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद या भाजप महिला कार्यकर्त्यानं जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. मुंब्रा वाय ब्रिज येथील उद्घाटनावेळी गर्दीच्या वेळी आव्हाडांनी जाणूनबुजून माझ्या दोन्ही खांद्याला धरून बाजूला ढकलल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. दरम्यान याबबातचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर विरोधकांनी माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट घातल्याचं म्हणत आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र पक्षातील वरिष्ठांच्या समजूतीनंतर त्यांना आपला निर्णय मागे घेतला.

आव्हाडांविरोधातील या गुन्हामुळे त्यांच्या समर्थकांनीही ठिकठिकाणी आंदोलने केली, काही ठिकाणी जाळफोळीच्या घटना घडल्या. यामुळे राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले होते. दरम्यान यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आव्हाडांच्या बाजूने भूमिका घेत भाजप त्यांना अडकवण्यासाठी अशाप्रकारे राजकीय षडयंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र घटनांमुळे आव्हाडांच्या राजकीय कारकिर्दीला कुठे तरी ठेच निर्माण झाली.


पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह ‘या’ राजकीय दिग्गजांकडून देशवासीयांना नवं वर्षाच्या शुभेच्छा

First Published on: January 1, 2023 12:36 PM
Exit mobile version