धक्कादायक! बसची वाट पाहत असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! बसची वाट पाहत असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. बसची वाट पाहत असलेल्या आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना अमरावती जिल्हातील धारणी तालुक्यातील टेमली येथे एका दलित आदिवासी महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे.

नक्की काय घडले?

पीडित महिला बस वाट पाहत असताना दोन नराधमांनी तिला जबरदस्तीने मोटार सायकलवर बसवले. त्यानंतर तिला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पण पोलिसांनी सत्ताधारांच्या दबावाखाली हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान माहितीनुसार पीडित महिला आणि तिची १७ वर्षांची मुलगी घटनेच्या दिवसापासून बेपत्ता आहे. शिवराय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांच्या मते त्या गुंडांनी या महिलेला बेपत्ता केले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ना सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला, ना अॅट्रॉसिटीचा. पण भाजपने तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी


 

First Published on: October 21, 2020 7:33 PM
Exit mobile version