प्रवाशांच्या आरामासाठी मध्य रेल्वेची सीएसएमटी स्थानकात ‘ही’ खास सुविधा

प्रवाशांच्या आरामासाठी मध्य रेल्वेची सीएसएमटी स्थानकात ‘ही’ खास सुविधा

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैससोय होऊ नये यासाटी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न केले जातात. रेल्वे प्रशासन नेहमीच विविध उपक्रम राबवत प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवत असते. अशातच लांबपल्ल्यांच्या प्रवाशांना आरामासाठी मध्य रेल्वेने स्लीपिंग पॉड्स आणि ऑगमेंटेड रिॲलिटी मॅजिक मिररची सुविधा उपलब्ध केली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. (General Manager, Central Railway inspects Sleeping Pods and Augmented Reality Magic Mirror at CSMT)

स्लीपिंग पॉड्स आणि ऑगमेंटेड रिॲलिटी मॅजिक मिररच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळावी यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी पाहणी केली. यावेळी शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग इती पांडे, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा), मध्य रेल्वे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

ऑगमेंटेड रिॲलिटी मॅजिक मिरर

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रथमच “ऑगमेंटेड रिॲलिटी मॅजिक मिरर” बसवण्याचे नाविन्यपूर्ण कंत्राट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या मेन लाइनवरील प्रवाशांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी NINFRIS धोरणांतर्गत मेसर्स टाईमस्लायडर टुरिझम प्रा. लिमिटेड यांना ५०,००,००० रुपये परवाना शुल्कासह ५ वर्षांच्या कालावधीसाठी दिले आहे.

समर्पित स्क्रोलिंग स्क्रीन, रेल्वेची माहिती, सामाजिक जागरूकता संदेशांसह डिजीटल ट्रेनचे वेळापत्रक प्रदर्शित करण्यासोबतच, हा करार प्रवाशांना आकर्षक अनुभव देईल. ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) मॅजिक मिररचे कार्य खाली स्पष्ट केले आहे.

ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) म्हणजे काय?

ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) ही डिजिटल व्हिज्युअल घटक, ध्वनी किंवा तंत्रज्ञानाद्वारे वितरित केलेल्या इतर संवेदी उत्तेजनांच्या वापराद्वारे वास्तविक जगातील वर्धित आवृत्ती आहे. हा व्हर्च्युअल अनुभव तयार करण्यासाठी वापरकर्त्याच्या डिव्हाइसभोवती एक वर्धित जग तयार करते.

ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) मॅजिक मिरर म्हणजे काय?

एआर मॅजिक मिरर स्क्रीनसमोर उभ्या असलेल्या व्यक्तीभोवती स्क्रीनवर एक आभासी जग तयार करण्यासाठी ऑगमेंटेड रिॲलिटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करते. ते पात्र तसेच आसपासचे असू शकतात. प्रवाशांना गुंतवून ठेवण्यासाठी महिन्याचे प्रसंगानुरूप दर महिन्याला सामग्री (कंटेंट) बदलले जातील. यामध्ये वेळोवेळी अपडेट करण्यासाठी डिजिटल ट्रेनचे वेळापत्रक देखील असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पॉड्स

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांना अधिक आराम आणि स्वस्त मुक्कामाचा पर्याय देण्यासाठी स्लीपिंग पॉड्स उघडण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या मेन लाइनवरील प्रतीक्षालयाजवळ शहरातील सर्वात स्वस्तात थांबण्याचे हे केंद्र आहे.

एकूण ४० पॉड्स आहेत ज्यात ३० सिंगल पॉड्स, ६ डबल पॉड्स आणि ४ फॅमिली पॉड्स आहेत. हे उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेल पूर्ण गोपनीयता, मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम इत्यादी प्रदान करेल. या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोडद्वारे (रिसेप्शनवर) आणि ऑनलाइन देखील केले जाऊ शकते.

मध्य रेल्वेने स्लीपिंग पॉड्सच्या विकासाचे आणि ऑपरेशनचे कंत्राट नमह एंटरप्रायझेसला पाच वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक १०,०७,७८६ रुपये परवाना शुल्कासह दिले आहे आणि याद्वारे रेल्वेला ५५.६८ लाख रुपयांचा महसूल मिळेल.

या शहराच्या आजूबाजूच्या हॉटेलमध्ये राहणे परवडत नसलेल्या प्रवाशांसाठी आरामदायी मुक्कामासाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने नुकतीच १३१.६१ चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे.

मध्य रेल्वेला एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत प्राप्त १४.१० कोटी रुपये, एप्रिल ते जून २०२१ या कालावधीतील १.८९ कोटी रुपयांच्या तुलनेत ६४६% ची अविश्वसनीय वाढ दर्शवते. भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या ६७व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कारांमध्ये मध्य रेल्वेने २०२१-२२ या वर्षासाठी वाणिज्यिक शिल्डही जिंकली आहे.


हेही वाचा – मुंबईकारांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १४.८० टक्के पाणीसाठा

First Published on: July 5, 2022 8:33 PM
Exit mobile version