कारवाई अटळ, डिसले गुरुजींकडून 34 महिन्यांचा पगार होणार वसूल

कारवाई अटळ, डिसले गुरुजींकडून 34 महिन्यांचा पगार होणार वसूल

बिहारच्या मुझफ्फरपूरमधील नितीश्वर कॉलेजचे शिक्षक डॉ. लालन कुमार यांनी २०१९ पासून शिकवण्यासाठी विद्यार्थी नसल्याने आतापर्यंतचा पगार परत करायचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आता देशभरातून कौतुक होतेय. एकीकडे या निर्णयाचे कौतुक होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील ग्लोबल टिचर पुरस्कार प्राप्त डिसले गुरुजी यांच्यावर काम न केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याकडून 34 महिन्यांचा पगार वसूल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत नियुक्तीस असलेले डिसले गुरुजी यांनी अलीकडेच शिक्षण पदाचा राजीनामा दिला, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्त असतानाही ग्लोबल टिचर डिसले यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली नाही, अशी माहिती चौकशीत उघड झाली. यासंदर्भात शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजींबाबत चौकशी अहवाल तयार केला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने पुन्हा चौकशी झाली. या अहवालानुसार कारवाई होण्याआधीच रणजित डिसले यांनी 7 जुलै रोजी राजीनामा नोटीस दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होऊन त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे. दरम्यान डिसले गुरुजींना अनेक फोटो जोडून 200 पानांचा खुलासा दिला, तरीही जिल्हा प्रशासन डिसले गुरुजींवरील कारवाई अटळ आहे. जवळपास 34 महिने कामावर हजर न राहता त्यांनी पगार घेतला. हा सर्व पगार आता सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून वसूल केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे.

डिसले गुरुजींच्या कामाची दखल घेत तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांची नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या काळात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती दिली गेली. मात्र काही काळ ते कामावरच गेले नाही संबंधित कामही केले नाही, अशी माहिती तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सादर केलेल्या दुसऱ्या एका चौकशी अहवाल उघड झाली आहे. जवळपास दोन हजार पानांचा हा अहवाल आहे.

ग्लोबल टिचर पुरस्कार मिळाल्यानंतर अमेरिकेतील फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या ऑफरसाठी त्यांनी रजा हवी होती. त्यासाठी त्यांनी अर्जही केला, मात्र अर्धवट कागदपत्रांमुळे त्यांचा रजेचा अर्ज नामंजूर झाला. यानंतर माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी डिसले गुरुजींचा रजेचा अर्ज मंजूर केला.

दरम्यान डिसलेंची विज्ञान केंद्रावरही नियुक्ती असताना ते तिथे आलेच नाही अशी माहिती संजय जावीर यांच्या समितीने निर्दशनास आणून दिली. तसेच सांगितले काम न करता स्वत;च्या सोयीने काम केल्याचेही चौकशी समिती पुढे आले आहे,

यामुळे डिसले यांच्या संदर्भात झालेल्या दोन्ही चौकशी समित्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार अशी माहिती सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिली आहे. यात आता डिसले गुरुजींकडून कारवाई टाळण्यासाठी राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे.


बूस्टर डोससाठी राज्यात संपूर्ण यंत्रणा उभी करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


 

First Published on: July 14, 2022 2:55 PM
Exit mobile version