गुगल ट्रेण्डवर ‘राज’ सत्ता; पवार, फडणवीसांना टाकलं मागे

गुगल ट्रेण्डवर ‘राज’ सत्ता; पवार, फडणवीसांना टाकलं मागे

गुगल ट्रेण्डवर 'राज' सत्ता

‘लाव रे व्हिडिओ’, असा आदेश देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मागे टाकत गुगल ट्रेण्डवर प्रथम स्थान मिळवले आहे. मागील आठवड्याभरापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या राज यांचा बोलबाला केवळ प्रचारसभांमध्येच नाही तर गुगल ट्रेण्डसमध्येही दिसून येत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये गुगलवर ‘Raj Thackeray’ हे दोन शब्द सर्च करणाऱ्यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचे गुगल ट्रेण्डमध्ये दिसत आहे. त्यामुळे नेटीझन्सचा ओढा पुन्हा एकदा अन्य नेत्यांच्या तुलनेत राज ठाकरेंकडे असल्याचे दिसून येत आहे.

असा वाढला राज ठाकरे यांचा गुगल ट्रेण्ड

पाडव्याला राज ठाकरे यांनी पहिली सभा घेतली असून १२ एप्रिला नांदेड येथील सभेपासून राज ठाकरेंनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आणि याच तारखेपासून गुगलवर राज ठाकरे सर्च करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. तसेच पाडव्याला राज ठाकरेंनी आपण मोदी आणि शाह यांच्याविरोधात राज्यभरात सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. या दिवशी राज ठाकरे यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्डमध्ये दिसत आहे. त्यानंतर सहा दिवसांनी राज यांच्या दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर राज यांच्या नावाने गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसत आहे.

येथे केले जाते ‘राज ठाकरे’ यांना सर्वाधिक सर्च

महाराष्ट्रातून राज ठाकरे यांच्याबद्दल सर्वाधिक सर्च केले जाते. त्या खालोखाल गोवा, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड या राज्यांमध्ये राज ठाकरे यांना सर्वाधिक सर्च केले जाते आणि विशेष म्हणजे यापैकी बहुतांश राज्य ही भाजपाची सत्ता असणारी राज्ये आहेत.

‘लाव रे तो व्हिडिओ’ होत आहे सर्च

राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील सर्वाधिक गाजलेले वाक्य म्हणजे ‘लाव रे तो व्हिडिओ’. हे वाक्य सर्वाधिक सर्च होत आहे. तसेच हे वाक्य सर्च करणाऱ्यांची संख्या देखील अधिक प्रमाणात वाढली आहे. तर राज ठाकरेंच्या नावाबरोबर सर्वाधिक सर्च होणाऱ्या शब्दांमध्ये ‘लाव रे तो व्हिडिओ’ पहिल्या क्रमांकावर आहे.


वाचा – ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या मागचे कलाकार; मुंबईच्या डिजिटल रथ राज्याव्यापी दौऱ्यावर

वाच –  ‘यंदा मोदी लाट नाही’, संजय राऊत उवाच


 

First Published on: April 19, 2019 8:01 PM
Exit mobile version