नाशिकमधील पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार? भाजपा पाठिंबा देण्यास तयार, पण…

नाशिकमधील पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार? भाजपा पाठिंबा देण्यास तयार, पण…

इंडिया आघाडीत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य मान्य असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे. मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली पाहिजे.

नाशिक – विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. डॉ.सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली असताना ऐनवेळी त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यातच, ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता प्रयत्न सुरू असतानाच भाजापाने मोठा दावा केला आहे. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्पष्ट केली.

“भाजपातर्फे आम्ही राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचा विचार करत होतो. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे पाटील यांनी मांडली. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली. आता आम्हाला दिसतंय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – मोठी बातमी! पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसच्या सत्यजित तांबेंनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत नाशिक मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होण्याकरता आम्ही प्रयत्न करू, असं सत्यजित तांबे यांनी आज सकाळीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपाची मदत घेतली जाईल का हे पाहावं लागणार आहे.

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रसने उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आला. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे सत्यजित तांबेंनी दोन अर्ज भरले. त्यामुळे आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत, याबाबत सत्यजित तांबे यांनी माहिती दिली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असला तरीही ते काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे.

हेही वाचा पदवीधर निवडणूक : उमेदवार बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; नाना पटोलेंचे वक्तव्य

पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आपच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारात अचानक बदल का करण्यात आला, याचीही कोणती माहिती नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

First Published on: January 12, 2023 7:07 PM
Exit mobile version