Rana : राणा दांपत्याला झटका! घरच्या जेवणासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

Rana : राणा दांपत्याला झटका! घरच्या जेवणासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

पोलीस स्थानकामध्ये पाणी आणि शौचालय वापरू दिले नाही म्हणून खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना गैरसोईबाबत तक्रार करणारे पत्र लिहिले होते. या पत्रानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात लक्ष घालत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा पोलीस स्थानकात चहा पितानाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. तसेच गृह विभागही याबाबतचा एक अहवाल लोकसभा अध्यक्षांना पाठवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान राणा दांपत्याने सत्र न्यायालयाकडे केलेली एक मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राणा दांपत्याला हा मोठा झटका मानला जात आहे.

हनुमान चालीसा पठण प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राणा दांपत्याला सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. राणा दांपत्याने घरच्या जेवणासाठीचा अर्ज हा गुरूवारी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला होता. पण हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळताना न्यायालयाने कारणही दिले आहे. राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात शनिवारी सुनावणी होणार आहे.

अर्ज फेटाळताना हायकोर्टाचे स्पष्टीकरण

राणा दांपत्याने गुरूवारी घरचे जेवण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण राणा दांपत्याला मुंबई सत्र न्यायालयाने झटका दिला आहे. घरच्या जेवणासाठी केलेला अर्ज हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळताना न्यायालयाने काही गोष्टी याचिकाकर्त्यांना स्पष्ट केल्या आहेत. जेलमध्ये सर्व कैद्यांना सकस आहार दिला जातो, असे जेल प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे घरचे जेवण देण्याची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात शनिवारी सुनावणी होणार आहे.


 

First Published on: April 29, 2022 8:40 PM
Exit mobile version