पुढील ४८ तासात पुन्हा मुसळधार पाऊस, मुंबईत ऑरेंज अर्लट जारी!

पुढील ४८ तासात पुन्हा मुसळधार पाऊस, मुंबईत ऑरेंज अर्लट जारी!

पाऊस

पुढील ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासात पावसाने तुफान हजेरी लावत १२४ मिलिमीटर पावसाची नोंद केली. यंदाच्या मोसमातील ही उच्चांकी गाठलेली आहे. काल १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एक जूनपासून २७३९ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. पण गेल्या वर्षी आजच्याच तारखेपर्यंत ५०३३ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

सध्या कोयना धरणातून सकाळी ८.३० वाजल्यापासून २५६०४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात वाढ करून सकाळी ११ वाजल्यापासून कोयना धरणातून एकूण ३५००० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे. तर दुपारी २ वाजता एकूण विसर्ग ४०,००० क्यूसेक्स करण्यात येईल. यामुळ कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या लोकांनी खबरदारीच्या सूचना कोयना धरण प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

First Published on: August 16, 2020 9:43 AM
Exit mobile version