राण्यांका गणपती पावलो, १७ सप्टेंबर पर्यंत कारवाई नको – कोर्टाचो आदेश

राण्यांका गणपती पावलो, १७ सप्टेंबर पर्यंत कारवाई नको –  कोर्टाचो आदेश

राण्यांका गणपती पावलो, १७ सप्टेंबर पर्यंत कारवाई नको - कोर्टाचो आदेश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधान आणि अटकेप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये नारायण राणेंना कोर्टाने १७ सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंविरोधात कोणतीही कारवाई करु शकत नाही असे निर्देश न्यालयाने दिले असल्याचे नारायण राणे यांचे वकिल सतिश मानशिंदे यांनी म्हटलं आहे. राणेंविरोधात जिथं जिथं गुन्हे दाखल झाले आहेत. तिथं जाण्याची गरज नसल्याचे राणेंच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट रोजी केलेलं वक्तव्य प्रक्षोभक नव्हतं असेही वकिल मानशिंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक पोलिसांनी २ सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे राणेंना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आजपर्यंत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. यापुढे कोणता गुन्हा दाखल करण्यात आला तर लगेच न्यायालयात धाव घेऊ असे नारायण राणे यांचे वकिल सतिश मानशिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणे यांनी यापुढे वादग्रस्त विधाने करावी की नाही याबाबत न्यायालयाने कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचेही वकिल मानशिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करु नये अशी विनंती राज्य सरकारच्या वकिलांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने या विनंतीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, पुणे, ठाण्यासह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण राणेंना जिथं गुन्हा दाखल आहे तिथं जाण्याची गरज नाही असे न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. नारायण राणे यांनी २३ ऑगस्ट रोजी केलेलं वक्तव्य प्रक्षोभक नव्हते असे वकिलांनी म्हटलं आहे.

सीबीआय चौकशीची वेळ आली

नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचे एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांच्या अटक होण्यापुर्वीच अटकेबाबत कोर्टात ते नाकारण्यात येईल असा निवाडा घोषित करतात. हे सगळं प्रकरण संशयास्पद आहेत. यामध्ये आयपीएस अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये काय बोलणं झालं. निवाडा होण्यापुर्वीच निकाल जाहीर करण्याची राज्याची मंत्र्यांची भूमिका ही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. यामुळे या सगळ्या प्रकरणची सीबीआय चौकशी होण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्र्यांच्याबाबत होत असल्यामुळे सीबीआय चौकशी करण्याची वेळ आली आहे. असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  नारायण राणेंच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात, आशिष शेलारांकडून सीबीआय चौकशीची मागणी


 

First Published on: August 25, 2021 4:29 PM
Exit mobile version