पुण्यात होर्डिंगचा खांब कोसळला; ४ ठार, ११ जखमी

पुण्यात होर्डिंगचा खांब कोसळला; ४ ठार, ११ जखमी

सदर घटनेचा फोटो

रस्त्यांच्या कडेला जाहिरातींसाठी मोठमोठे होर्डिंग उभारण्याची पद्धत मोठ्या शहरांसाठी काही नवी नाही. पण हीच पद्धत पुण्यातल्या काही नागरिकांसाठी मात्र दुर्दैवी ठरली आहे. पुण्यातल्या शनिवार वाड्याजवळच्या जुना बाजार परिसरात होर्डिंग्जच्या खांबामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. जुना बाजार चौकात एक होर्डिंगचा मोठा लोखंडी खांब खाली उभ्या असलेल्या रिक्षांवर कोसळला. या अपघातात २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. चौकामध्ये असलेल्या रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतरीत्या हे होर्डिंग्ज उभारण्यात आले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. होर्डिंग्ज अनधिकृत असल्यामुळे ते काढण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. हे होर्डिंग कोसळलं त्यावेळी त्याखाली ५ रिक्षा आणि एक कार अडकल्यामुळे मोठा गहजब उडाला. होर्डिंग पडला त्या चौकात कायमच मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे जीवितहानीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा – पुणे होर्डिंग दुर्घटना: काल आईचे निधन, आज वडिलांवरही काळाचा घाला

मृतांची नावे –

श्यामराव भगवानराव धोत्रे (वय ४८)
भीमराव कासार (वय ७०)
शिवाजी देविदास परदेशी (वय ४०)
जावेद मिसबाऊद्दीन खान (वय ४९)

गंभीर जखमी –

उमेश धर्मराज मोरे (वय ३६)
किरण ठोसर (वय ४५)
यशवंत खोबरे (वय ४५)
महेश यशवंतराव विश्वेश्वर (वय ५०)
रुक्मिणी परदेशी (वय ५५)
देवांशु परदेशी (वय ४)
समृद्धी परदेशी (वय १६)
रामचंद्र भोगनळी(वय ४२)
कैलास गायकवाड (वय २६)
शुभम पंगुल (वय २०)

अतिदक्षता विभाग असलेले जखमी

उमेश मोरे (५५)

First Published on: October 5, 2018 4:18 PM
Exit mobile version