LockDown: आता १४ मे पासून मिळणार घरपोच दारू

LockDown: आता १४ मे पासून मिळणार घरपोच दारू

liquor

वाईन शॉप सुरू केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आणि अनेक ठिकाणी वाईन शॉप बंद करण्यात आले. यामुळे तळीरामांची पुरती निराशा झाली असताना आता तळीरामांना पुन्हा एकदा खुशखबर मिळाली आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्यावर दारू घरपोच मिळणार असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तसे आज परिपत्रक काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान परिपत्रकामध्ये दिलेल्या अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहे. तसेच त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारूची होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीला मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर वापर करावा, अशा सूचना देखील उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.

ही घ्यावी लागणार काळजी 

दरम्यान घरपोच दारू विक्री करताना डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. तसेच मध्य विक्रीसाठी घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. लॉकडाऊन अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील असे सांगण्यात आले आहे. यासोबत शासनाने काढलेल्या आदेश शासन सुधारित किंवा रद्द करू शकेल असे देखील म्हटले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑनलाइन दारू विक्री करण्याचा निर्णय घेतला असून, १४ तारीखपासून घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी घरपोच दारू विक्री करताना डिलिव्हरी बॉयची तपासणी करून घ्यावी लागणार आहे. तसेच डिलिव्हरी बॉयला राज्य ओळखपत्र बंधनकारक असले. –  शंभूराजे देसाई , राज्यमंत्री
First Published on: May 12, 2020 6:23 PM
Exit mobile version