रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे पैसै

रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे पैसै

रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे पैसै

पिंपरी – चिंचवड येथे एक प्रवासी आपली महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे आणि १७ हजार रुपये रिक्षामध्ये विसरले होते. मात्र या प्रामाणिक रिक्षाचालकाने प्रवाशाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि पैसे प्रवाशाला देऊन माणुकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे. रिक्षाचालकाच्या कामगिरीचे कौतुक करत काळेवाडी पोलिसांनी रिक्षा चालक रणजित जाधव यांचा सत्कार केला आहे.

अशी परत मिळाली हरवलेली बॅग

प्रदीप एकशिंगे हा तरुण मूळ लातूरचा असून तो पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी निमित्त आला होता. काम झाल्यानंतर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रिक्षा चालक रणजित जाधव यांच्या रिक्षात बसून काळेवाडी येथील खासगी बस स्थानकाजवळ घाईत उतरला. तेथून तो खासगी बसने लातूरला जाणार होता. काही मिनिटांनी आपल्या रिक्षात प्रवाश्याची बॅग असल्याचे रिक्षाचालकाच्या लक्षात आले. ती बॅग घेऊन रिक्षा चालक रणजित जाधव यांनी थेट काळेवाडी पोलीस चौकी गाठली.


वाचा – ट्रॅकमनने केला एक लाखांचा मुद्देमाल परत


बॅगेत १७ हजार रुपये रोख रक्कम शैक्षणिक कागदपत्रे आणि कपडे होते. पोलिसांनी तात्काळ कागदपत्रे तपासली असता त्यात प्रदीप एकशिंगे याच्या वडीलांचा मोबाईल नंबर मिळाला पोलीस अधिकाऱ्याने त्यावर फोन करत संबंधित माहिती दिली. हरवलेली बॅग काळेवाडी चौकीत असल्याचे प्रदीपच्या वडिलांना सांगितले. हीच माहिती वडीलांनी प्रदीपला फोनद्वारे दिली. प्रदीप ताबडतोब काळेवाडी पोलीस चौकीत आला आणि पोलिसांनी प्रदीपला त्याची विसरलेली बॅग दिली. यामुळे प्रदीपचा जिव भांड्यात पडला. प्रदीपने रिक्षा चालकाचे आभार मानले असून रणजित जाधव यांचा प्रामाणिकपणा पाहून पोलिसांनी त्यांचे यांचे कौतुक केले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र चव्हाण, पोलीस कर्मचारी दातार, मोमीन राठोड यांनी पुष्प गुच्छ देऊन रणजित जाधव यांचा सत्कार केला आहे.


वाचा – प्रामाणिक टॅक्सीचालक शेखने परत केले ७ लाखांचे दागिने


 

First Published on: December 10, 2018 11:49 AM
Exit mobile version