बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 20 जण जखमी

बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 20 जण जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एका खासगी लक्झरी बसच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाण्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातग्रस्त बसमधून बाहेर पडून दोन प्रवासी महामार्गाच्या बाजूला जात होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोघांना चिरडले. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर एक प्रवासी गंभीर जखमी आहे. आज पहाटे 4.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातानंतर राही ट्रॅव्हल्सची ही बस महामार्गाच्या अगदी मध्यभागी पलटी झाली, यामुळे अपघातग्रत प्रवासी बसमधून बाहेर पडून महामार्गाच्या एका बाजूला येत होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रवाश्यांवर देऊळगाव राजा आणि जालना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली आहे.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहे. या महामार्गावर चालकाची एक चूक देखील मोठी जीवघेणी ठरत आहे. यात अति वेग मारक ठरत असल्याचे दिसत आहे. यात अनेक वेळा रात्रीचा प्रवास अधिक जीवघेणा ठरत असल्याचं म्हटल जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिलं जातं. या महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल. मात्र महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळं हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.


पालघरची MBBS विद्यार्थिनी सदिच्छाच्या हत्येचा छडा; आरोपी मिट्टू सिंहला अटक

First Published on: January 20, 2023 8:59 AM
Exit mobile version