रघुनाथ कुचिक लैंगिक छळाच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंचावर, म्हणाले…

रघुनाथ कुचिक लैंगिक छळाच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंचावर, म्हणाले…

शिवसेनेत बंड झाल्यानंतर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी शिवसेनेकडून राज्यभर मेळावे बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे. पुण्यातही त्या अनुषंगाने जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात लौंगिक छळाचा आरोप झालेले शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आरोपांच्या कचाट्यात अडकल्यानंतर रघुनाथ कुचिक पहिल्यांदाच शिवसेनेच्या मंचावरून जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यानी शिवसेनेच्या मंचावरून सर्व आरोप फेटाळले आणि या सगळ्यातून सहीसलामत बाहेर येऊ, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन; जे पोटात मळमळत होते, ते ओठावर आले, संजय राऊतांचा टोला

कुचिक काय म्हणाले –

भाजपने किती लोकांना त्रास दिला आहे. ईडी, सीबीआयपासून पासून कुठलाही नेता सुटला नाही. एवढेच काय तर वैयक्तिक चारित्र्य हननापासून देखील सुटला नाही. त्याचा बळी मी आहे. मी हे सगळे भोगले आहे. तुमच्याकडे इनकम नसेल तर तुमचे चारित्र्य पाहिले जाते. मात्र, येत्या काळात मी या सगळ्यापासून सहीसलामत बाहेर येईन, अशा विश्वास कुचिक यांनी व्यक्त केला

काय आहे प्रकरण –

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार करुन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये भाजपाच्या नेत्या आणि महाराष्ट्र भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. चित्रा वाघ या प्रकरणावर सतत भूमिका मांडत होत्या. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते.

हेही वाचा –  “मला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावाचा पश्चाताप…”; राज ठाकरेंनी स्पष्ट केले शिवसेना फुटण्याचे कारण

First Published on: July 24, 2022 12:07 PM
Exit mobile version