‘मशिदीवरील भोंग्याचा त्रास आताच कसा झाला?’

‘मशिदीवरील भोंग्याचा त्रास आताच कसा झाला?’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील

‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इतकी वर्षे राजकारणात आहेत. मात्र, त्यांच्या कानांना आताच मशिदीवरच्या भोंग्यांचा त्रास व्हायला लागला का?’, असा प्रतिसवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. तसेच ‘शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाचा मुद्दा कोण हाती घेणार, असा प्रश्न होता. तो मनसेने घेतला आहे. त्यामुळे हे केवळ राजकारण आहे,’ असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

यावर इम्तियाज जलील यांनी दिले उत्तर

झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिवेशनात हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरी मुस्लिम देशातून हाकलून देण्याची मागणी केली. यासाठी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच ‘धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला’? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही, असे देखील ते पुढे म्हणाले. यावर आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मशिदीवरील भोंग्याचा त्रास आताच कसा झाला?’, असे विचारत प्रतिसवाल केला आहे.

पक्षाचा झेंडा का बदला?

‘मनसे पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता तो हा झेंडा होता. मी माझ्या पहिल्या सभेत सांगितले होते, तेव्हा माझे आजोबा हजर होते. त्या संघटनेला दिलेले नाव देखील माझ्या आजोबांनी दिले होते. तो जो झेंडा होता तो संयुक्त महाराष्ट्र समितीने देखील वापरला होता. त्यानंतर ही समिती विखुरली आणि शिवसेना तयार झाली. पुढे जे काही घडलं ते बाळासाहेब ठाकरेंमुळे घडले. हे सर्व करण्यासाठी जे करावे लागते त्यासाठी माणसे असावी लागतात मी एकटा होतो. तेव्हा मनसे स्थापन करताना मागे कोणी नव्हते सांगायला कोणी नव्हते. अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. हा रंग घ्या तो घ्या, सोशल इंजिनिअरींग करणे म्हणतात त्याला. तेव्हापासून माझ्या डोक्यात हा झेंडा होता. अनेकांना वाटतात आत्ताच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा झेंडा आणला. मात्र, हा केवळ योगायोग आहे. हा मुळ डीएनए आहे. तो झेंडा आणायचाच होता. मात्र, कसा आणायचा हा विचार करताना पक्षाच्या अधिवेशनात हा झेंडा आणण्याचे ठरवले.


हेही वाचा – पाकिस्तानी, बांगलादेशी मुस्लिमांना देशातून हाकला


 

First Published on: January 24, 2020 4:12 PM
Exit mobile version