पहिल्या टप्प्यात ५३ हजार पुणेकरांना मिळणार कोरोनाची लस

पहिल्या टप्प्यात ५३ हजार पुणेकरांना मिळणार कोरोनाची लस

प्रातिनिधीक फोटो

येत्या १६ जानेवारीपासून देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकादेखील सज्ज आहे. यावेळी ५३ हजार नोंदणीकृत व्यक्तींना पंधरा केंद्रांमध्ये कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार असल्याचे सांगितल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये सोमवारी आयोजित बैठकीनंतर लसीकरण नियोजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. दरम्यान, सरकारी आणि खासगी आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिकांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या कोरोना लसीकरण मोहिमेकरता पालिकेकडे साधारण ५३ हजार व्यक्तींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून दोन कोरोना प्रतिबंधक लसींना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ-अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेली आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’ने उत्पादित केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेक कंपनी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विकसित केलेली ‘कोव्हॅक्सीन’ या लसींना आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून केंद्र सरकारच्या सुचनेनुसार या लसींचे ड्रायरन देखील घेण्यात आले.

पुणे शहरातील पालिका आणि खासगी अशा १५ रुग्णालयात या कोरोना लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे. याकरता तब्बल ४०० डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर त्या योग्य पद्धतीने साठवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.

या ठिकाणी होणार लसीकरण


First Published on: January 12, 2021 12:07 PM
Exit mobile version