पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ITMS यंत्रणा बसवणार; मेटेंच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर ITMS यंत्रणा बसवणार; मेटेंच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचे 14 ऑगस्टला पुणे-मुंबई एक्सप्रेसवर अपघाती निधन झाले. या अपघाती निधनावर त्यांची पत्नी तसेच नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. या संदर्भातील मुद्दा आज विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेस आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. लक्षवेधीच्या माध्यमातून गायकवाड यांनी विनायर मेटे यांच्या अपघाताचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे’, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (ITMS system to be installed on Pune-Mumbai Expressway Information of the DCM in the Legislative Assembly after the accidental death of vinayak methe)

विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. यावर कॉंग्रसे आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. तसेच, त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

“विनायक मेटे यांच्या अपघातावेळी एक ट्रॉलर महामार्गाच्या शेवटच्या लेनमधून चालला पाहिजे होता. तो मधल्या लेनमधून चालत होता. त्यामुळे त्यांच्या चालकांना ओव्हरटेक करण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे काही काळ चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि तो तिसऱ्या लेनमध्ये गेला. त्यावेळी त्यांच्यासमोर एक गाडी होती. या दोन गाड्यांच्यामधून मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. हे चुकीचे होते. आणि थोड्याच वेळाच गाडीमध्ये ज्या बाजूला विनायक मेटे बसले होते, त्या बाजूला जबर धक्का बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“विनायक मेटेंच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते व त्यांच्या पत्नींनी माझ्याजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचे ते म्हणाले. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीरबाब म्हणजे विनायक मेटे यांच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही असे म्हटले गेले. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मु़ंबई व रायगड पोलिस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. त्याने IRB ला मदत मागितल्यावर 7 मिनिटात मदत मिळाली. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


हेही वाचा – समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभेत कारवाईचे निर्देश

First Published on: August 22, 2022 11:06 AM
Exit mobile version