घरक्राइमसमर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभेत कारवाईचे निर्देश

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभेत कारवाईचे निर्देश

Subscribe

समर्थ रामदासांच्या जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरातून 700 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या संदर्भातील मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.

समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरातून 700 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या संदर्भातील मुद्दा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तपास केला जाईल. तसेच, अज्ञात चोरट्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली. (Historical idol stolen from Ram temple in birth village of Samarth Ramdas Deputy Chief Minister directs action in assembly)

“जालन्या जिल्ह्यात ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. पहाटेच्या सुमारास या मूर्ती चोरी केल्या आहेत. जवळपास या मूर्ती 700 वर्षांपूर्वीच्या होत्या. महाराष्ट्रासह मुंबईतून अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी”, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

- Advertisement -

“या घटनेची माहिती मिळताच मी पोलीस महासंचकाशी बातचीत केली आहे. तसेच, त्यांना या घटनेची दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत”, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मंदिरातून तब्बल 700 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्ती चोरी करण्यात आल्या आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे. समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्ती देखील चोरीला गेल्या आहेत.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी रात्री 3 वाजताच्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत.


हेही वाचा – मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -