अन् मंगळवेढ्यातील पाप फक्त देवेंद्र फडणवीस यांचेच – जयंत पाटील

अन् मंगळवेढ्यातील पाप फक्त देवेंद्र फडणवीस यांचेच – जयंत पाटील

जलसंपदा मंत्री जयंत पाटील

‘मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पैसे आणून योजना पूर्ण करु’, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देते, ‘अरे बाबा पैसे कोणी मागितले तुमच्याकडे. पैसे आम्ही मागितलेत का? महाराष्ट्र सरकारची ताकद आहे, या योजना पूर्ण करण्याची तुम्ही चिंता करु नका. जर मंगळवेढ्यासाठी एवढेच प्रेम आणि पुळका होता तर देवेंद्र फडणवीस पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अनेक ठिकाणी निर्णय घेऊ शकले तर मंगळवेढ्यात का घेऊ शकले नाहीत. पाच वर्षात ही योजना पूर्ण करायला हवी होती. त्यामुळे मंगळवेढ्यात राहणाऱ्या रहिवाशांना पाणी मिळत नसेल तर त्याचे पाप फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचे आहे’, असा घणाघात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरख भालके यांच्या प्रचाराच्यावेळी केला.

मंगळवेढेकरांना पाण्यापासून वंचित ठेवले

‘भारतीय जनता पक्षाने मंगळवेढ्यातील गावकऱ्यांच पाणी घालवण्याचे काम केले. पाच वर्ष केवळ काँग्रेसचे उमेदवार आहेत. काँग्रेस आमदार आहेत आणि ते आपल्याला दात देत नाहीत. आपल्याकडे येऊन मुजरा करत नाहीत. त्यामुळे भाजपने मंगळवेढेकरांना पाण्यापासून वंचित ठेवले. त्यामुळे आज आम्ही तुमच्या समोर भगीरथ भालकेच्या रुपाने एक तरुण मुलगा उभा केला आहे. त्यांच्या वडीलांनी मंगळवेढे या मतदार संघासाठी अनेक खसता खाल्ल्या आहेत. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याच काम केले आहे. सामान्य माणसाची त्यांची नाळ जोडलेली होती. म्हणून आता सर्वांची जबाबदारी आहे की, ही व्यवस्था. हीच परंपरा पुढे चालवत असताना भगीरथ यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवल तर आपल्या विकास कामांचा वेग तसाच राहिल’.


हेही वाचा – ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही, फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल


 

First Published on: April 15, 2021 7:24 PM
Exit mobile version