घरताज्या घडामोडीही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही, फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही, फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Subscribe

मराठमोळ्या मावळ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून टीपू सुल्तान की जय म्हणाणाऱ्यांच्या गळ्यात हार घालत असाल तर माझा मराठी खांदा कधी साथ देणार नाही

बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी रिंगणात उतरल्या आहेत. मंगला अंगडी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी खासदार संजय राऊत या ठिकाणी आले असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तसेच ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत बेळगावमध्ये कशाससाठी आले आहेत. ते समजले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर गोळी चालवून काँग्रेसला मदत करण्यासाठी संजय राऊत इथे आले आहेत. शिवसेना आता बाळासाहेब ठाकरेंची राहिलेली नाही. ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला गुण नाही तर वाण लागला अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. काँग्रेसच्या सोबत शिवसेनेने माहाराष्ट्रात अजान स्पर्धा घेतली यानंतर भाजपने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत महाराष्ट्रात शिवगाण स्पर्धा घेतली. संजय राऊत बेळगावमध्ये आले कारण आता बेळगावमध्ये आणि महाराष्ट्रात शिवसेना टीपू सुल्तान जयंती साजरी करत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस टीपू सुल्तान जयंती साजरी करते त्याला निवडून देण्याकरता हे शिवसेनेचे नेते इथे आले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला समोर करुन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात आहे.

- Advertisement -

परंतु जर मराठमोळ्या मावळ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून टीपू सुल्तान की जय म्हणाणाऱ्यांच्या गळ्यात हार घालत असाल तर माझा मराठी खांदा कधी साथ देणार नाही असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी १२ मावळ्यांमध्ये एक अशी ज्वाला पेटवली की ज्या ज्वालेने दिल्लीच्या तत्काला देखील झुकवले त्या छत्रपतींच्या नावावर टीपू सुल्तान जयंती साजरी करणार्यांच्या गळ्यात गळे घालत असाल तर खबरदार मराठी माणूस भोळा आहे पण मुर्ख नाही आहे. मराठी माणूस भोळा आहे पण तो हे समजतो म्हणून मराठी माणूस हिंदूत्ववादी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपतींच्या पुतळ्यासमोर बसले

- Advertisement -

फडणवीस पुढे म्हणाले की, २०१४ साली लोकसभा निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हा ते सर्वप्रथम रायगडावर गेले होते. रायगडावर छत्रपतींच्या पुतळ्यासमोर ते हात जोडून १५ मि. बसले होते. आम्ही त्यांना दुरुन पाहत होते. नंतर मोदींना विचारले तुम्ही १५ मि. शांत का बसला होता. यानंतर मोदींनी सांगितले की, या ठिकाणी जी ऊर्जा मला मिळाली, जी देशभक्ती मला मिळाली यावर मला विश्वास बसला की या देशात छत्रपतींना हवं ते मी आणू शकेल आणि सामान्य नागरिकांची सेवा मी करु शकेल असे देवेंद्र फडणवीसांनी बेळगावमधील सभेत म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -