कैलास पाटील यांचे उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर निर्णय

उस्मानाबाद – शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आमदार कैलास पाटील यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

कैलास पाटील हे ठाकरे गटातील आमदार आहेत. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरता त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन सुरू केले होते. तसंच, गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी बेमुदत उपोषण केले होते. तर, शनिवारी उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा – एसआरए घोटाळ्यासाठी पेडणेकरांकडून मृत भावाच्या फोटोचा वापर, किरीट सोमय्यांचा कागदपत्रांसहित दावा

गेल्या सहा दिवसांपासून उपोषण आणि आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाने लक्ष दिलं नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून रास्ता रोको करण्यात आला. तसंच, जिल्हाधिकारी कार्यालयावरही आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे लावण्यात आले, जल बैठे आंदोलन छेडण्यात आली. मात्र, तरीही प्रशासनाने लक्ष दिले नहाी. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात उस्मानाबाद बंदचे आवाहन केले. बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तर, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ द्यावेत, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

First Published on: October 30, 2022 2:47 PM
Exit mobile version