अहमदनगर : लेडिज गिफ्ट शॉपमध्ये तलवारींचा साठा, पोलिसांकडून मालकाला अटक

अहमदनगर : लेडिज गिफ्ट शॉपमध्ये तलवारींचा साठा, पोलिसांकडून मालकाला अटक

अहमदनगर शहरात असलेल्या एका दुकानात तलवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने आणि गिफ्ट असलेल्या दुकानात या तलवारी आढळून आलेल्या आहेत.

अहमदनगर शहरात असलेल्या एका दुकानात तलवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलांसाठी सौंदर्यप्रसाधने आणि गिफ्ट असलेल्या दुकानात या तलवारी आढळून आलेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दुकानाच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. दुकानाचे मालक नंदकिशोर मोडालाल बायड (वय वर्षे 53) याच्याकडून पोलिसांना याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाही, ज्यानंतर पोलिसांकडून मालकाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – चावी फडणवीसांकडे आहे, मी फक्त सांगतो ते तिजोरी खोलून पैसे देतात; शिंदेंचं मोठं वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, नगरच्या बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे वाद होत होते. त्यामुळे पोलिसांकडून या बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यानंतर याच बाजारपेठेत असलेल्या मोची भागात महावीर स्टोअर्स नामक दुकान आहे. या दुकानात बेकायदेशीर तलवारीचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांच्या पथकाने पंचासह दुकानात जाऊन तपासणी केली. त्यावेळी तेथे काऊंटरच्या खालील भागात पोलिसांना सहा तलवारी आढळून आल्या. या तलवारी पितळ धातूच्या असून त्यावर “सिरोही की तलवार गँरटी ३० साल” असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दुकानमालक मोडालाल बायड याच्याकडे या तलवारीसंबंधी चौकशी केली. मात्र, पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. या दुकानात महिलांसाठीची सौंदर्य प्रसाधने आणि भेटवस्तूंची विक्री केली जाते. त्यामुळे या दुकानात तेथे तलवारी कशा आल्या? याची चौकशी पोलिसांनी केली. मात्र, दुकानमालक बायड यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही त्यामुळे पोलिसांनी त्या तलवारी जप्त करत दुकान मालकावर कारवाई केली.

दुकान मालक मोडालाल बायड याला भारतीय शस्त्र कायद्याचा भंग केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ज्या तलवारी या दुकानात सापडलेल्या आहेत, त्या विक्री करण्यासाठी ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, या तलवारी कुठून आणल्या, याआधी तलवारी कोणाला विकण्यात आलेल्या आहेत का? या तलवारी नेमक्या कशासाठी ठेवण्यात आल्या होत्या? या सर्व बाबींचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्याच्या संवेदनशील वातावरणात भर बाजारपेठेतील दुकानात तलवारी आढळून आल्याने पोलीस अधित सतर्क झाले आहेत.

याच महिन्यात 15 मेला छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमध्ये शेवगाव परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सतर्क होत जिल्ह्यातील अनेक भागांत पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पण आता अचानक महिलांच्या दुकानातच तलवारी आढळल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

First Published on: May 31, 2023 6:21 PM
Exit mobile version