सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांचे भागभांडवल दुप्पटीने वाढवले

सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांचे भागभांडवल दुप्पटीने वाढवले

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारित असलेल्या ४ महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार, राज्य सरकारने आज शासन निर्णय घेतला आहे. (Large increase in the share capital of corporations under the Department of Social Justice)

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी ५०० कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल ७३ कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल ३०० कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल ५० कोटींवरून दहा पटीने वाढवून ५०० कोटी करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय आज जाहीर केला आहे.

हेही वाचासामाजिक न्याय विभागाच्या प्रभावी कामगिरीसाठी कायदा करणार – धनंजय मुंडे

संबंधित महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी आमच्या विनंतीवरून राज्यसरकारने भरभरून निधी दिला असून अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – कोरोनाच्या संकटात तृतीयपंथीयांना १५०० रूपयांची आर्थिक मदत, सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

First Published on: June 8, 2022 3:56 PM
Exit mobile version