CNG, PNG होणार स्वस्त? सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

CNG, PNG होणार स्वस्त? सर्वसामान्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

पुणेकरांना दिलासा! CNG च्या दरांत मोठी घसरण

मागील अनेक महिन्यांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सीएनजी (CNG) आणि पीएनजीचेही (PNG) दर वाढ असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. परंतु, या सीएनजी व पीएनजीच्या दरांतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे CNG आणि PNG चे दर कमी होणार आहेत. (likely cng png price cut down due to central government accepted kirit parikh panel recommendations)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी 2014 च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजी स्वस्त आता स्वस्त होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात 2 वर्षात किंमत 8.57 डॉलरने वाढली आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने सुधारित घरगुती गॅस किंमतीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, स्थिर किंमत निश्चित करण्यासाठी आणि बाजारातील प्रतिकूल चढउतारांपासून उत्पादकांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर चार राज्यांच होणारे बदल


हेही वाचा – अभियांत्रिकी प्रवेशासाठी JEE Mainनंतर 75 टक्के गुणांचा पात्रता निकष का? न्यायालयाचा सवाल

First Published on: April 7, 2023 8:05 AM
Exit mobile version