‘मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.’

‘मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.’

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेने बीकेसी येथील एमएमआरडीए मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार देखील केला. ११ ज्येष्ठ शिवसैनिकांतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वचन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर बसून पूर्ण केलं आहे. त्यानिमित्ताने या भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका आणि भगवा झेंडाच का घेतला? याबाबत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत.

जबाबदारीपासून पलवाट काढणार नाही

मला सर्व जुने २३ जानेवारीचे दिवस आठवतं आहेत. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवबंधन बांधून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली. नवीन जबाबदारी घेतल्यानंतरचा हा पहिला सत्कार मी स्वीकारला. याचं कारण हा सत्कार माझा नाही हा तुमचा आहे. जी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल त्यापासून मी पलवाट काढणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचा अंतरंग सुद्धा भगवाचं आहे आणि आमचा रंग सुद्धा भगवाचं

मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही लढणारा आहे. प्राण गेला तरी बेहतर पण मी तुमच्याशी कधीही खोट बोलणार नाही. ना आम्ही आमचा रंग बदला ना आम्ही आमचा अंतरंग बदला. त्यामुळे अजूनही आमचा अंतरंग सुद्धा भगवाचं आहे आणि आमचा रंग सुद्धा भगवाचं आहे, असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

तुमचं काय काय उघड झालं?

पुढे ते म्हणाले की, २०१४ साली तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता आमचा दिलेला शब्द मोडल्यानंतर आमचा चेहरा उघड झाला असेल. पण, तुमचं काय तुम्ही आख्खेच्याआख्खे उघडे झाला आहात. हे पूर्ण दुनियेने पाहिलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना त्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर!


 

First Published on: January 23, 2020 10:02 PM
Exit mobile version