देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन

देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन

भारतातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना आणि दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे. लॉकडाऊन-४ मध्ये रात्री ७ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.

लॉकडाऊन ४.० च्या नव्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार आहे. तसेच सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडिअम प्रेक्षकांविना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील झोननुसार नियमावली राज्य सरकारला ठरवता येणार आहे. मात्र रेड झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रेड झोनमधील लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन ४ ची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.

काय बंदच राहणार
* राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
* मेट्रोसेवा बंद राहणार
* शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
* हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
* सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
* विवाह, सोहळे, सभा-समारंभांवरील बंदी कायम.
* ६५ वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडण्यास बंदी

कंटेन्मेंट झोन वगळता यांना परवानगी
*होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु.
*पोलीस, आरोग्य कर्मचार्‍यांसाठी हॉटेल चालू राहणार.
*सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार
*आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने)
*राज्याने ठरवलेली जिल्हांतर्गत वाहतूक
*स्पोट्स कॉम्लेक्स आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडण्यास परवानगी

वाढलेला लॉकडाऊन
पहिला लॉकडाऊन – २५ मार्च ते १४ एप्रिल (२१ दिवस)
दुसरा लॉकडाऊन – १५ एप्रिल ते ३ मे (१९ दिवस)
तिसरा लॉकडाऊन – ४ मे ते १७ मे (१४ दिवस)
चौथा लॉकडाऊन – १८ मे ते ३१ मे (१४ दिवस)

First Published on: May 18, 2020 6:55 AM
Exit mobile version