दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी आज संध्याकाळपर्यंत थांबणार

दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी आज संध्याकाळपर्यंत थांबणार

रणधुमाळी

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून देशभरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली होती. मात्र आता या रणधुमाळीता वेग दिवसेंदिवस मंदावणार आहे. देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले असून येत्या गुरुवारी म्हणजे १८ एप्रिल २०१९ रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. हे मतदान देशभरातील १३ राज्यांमधून एकूण ९७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदानाच्या पार्श्वनभूमीवर आजपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा वेग मंदावणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता या रणधुमाळीला पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात ‘या’ मतदार संघामध्ये होणार निवडणूक

महाराषट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूर शहर या मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

‘या’ नेत्यांचा प्रचार जोरात सुरु

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सर्वच नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहे. बहुजन आघाडीचे नेते अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे रिंगणात आहेत. आपण पुन्हा जिंकणार या विश्वासावर ते प्रचार करीत आहेत. तर काँग्रेसचे हिदायत पटेल धोत्रेंना टक्कर देणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर, धोत्रे आणि पटेल यांच्यात अटीतटीची तिहेरी लढत होणार आहे. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांचाही प्रचार जोरात सुरु आहे. अमरावतीमधील नवनीत राणा यांच्या प्रचारामध्ये सेलेब्रेटी आल्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी पाहायला मिळत होती. तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची प्रचारसभा जोरात सुरु आहेत. उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांचा प्रचार जोरात सुरु आहे. या दोघांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

First Published on: April 16, 2019 2:51 PM
Exit mobile version