Gadchiroli-Chimur Voting : गडचिरोलीत सरासरी ६१.३३ टक्के मतदान

Gadchiroli-Chimur Voting : गडचिरोलीत सरासरी ६१.३३ टक्के मतदान
लोकसभा २०१९ निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी मतदानाला सुरुवात केली आहे. हा मतदारसंघ खुल्या वर्गासाठी राखीव असून येथे एकूण १० लाख २७ हजार ४५४ मतदार आहेत. यामध्ये ४ लाख ८९ हजार ९८० महिला तर ५ लाख ३७ हजार ६७४ पुरुष इतके मतदार आहेत.
loksabha 2019 Gadchiroli-Chimur Voting
गडचिरोली-चिमूरमध्ये मतदानाला सुरुवात
Priya More

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सरासरी ६१.३३ टक्के मतदान झाले.

Priya More

गडचिरोलीमध्ये ५ वाजेपर्यंत ६१.३३ टक्के मतदान झाले

Priya More

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन पोलीस जखमी झाले आहेत.

एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोंदी येथे ही घटना घडली आहे

Pradnya Ghogale

गडचिरोली-चिमूर येथील मतदान संपले आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी ७ ते ३ ही मतदान करण्याची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे गडचिरोली-चिमूर येथील मतदान संपले असून आतापर्यंत १५ टक्के मतदान झाले आहे.

Pradnya Ghogale

शंकरपूर गावाजवळ अपघात

गडचिरोलीमधील शंकरपूर गावाजवळ अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. ट्रॅकटर उलटून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. मतदार करुन परतणाऱ्या नागरिकांमधील तीन जणांचा यामध्ये अपघात झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: April 11, 2019 8:52 AM
Exit mobile version