काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो, फडणवीसांचा अजितदादांना टोला

काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो, फडणवीसांचा अजितदादांना टोला

मविआ सरकारच्या काळातील मंजूर विकास कामांच्या स्थगितीवरून अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांविरोधात टोलेबाजी करताना दिसले. अजित पवार तुम्ही सात सात वेळा निवडून आलात आम्ही कमी आलो आहे, पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

विकास कामांच्या स्थगितीवर राज्यात मी अनेक सरकारे बघितली आहेत. अगदी नारायण राणेंपासून विरोधी गोटातील सरकार मी पाहीले आहे. मी देखील सात वेळेस निवडून आलो आहे. मात्र, असे कधीही बघितले नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. याच टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.  यावेळी मविआच्या आमदारांनी ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’, ‘स्थगिती सरकार हाय हाय’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.

अडीच वर्षात भाजपाच्या लोकांना एक नवा पैसा दिला नाही

यावेळी अजित पवारांनी केलेले आरोप खोटून काढत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आले त्यावेळी आमची सर्व काम रोखण्याचं काम मविआ सरकारने केलं. माझ्या स्वत:च्या मतदार संघातील काम त्यावेळच्या सरकारने रोखली, सगळ्यांच्या मतदार संघातील काम तुम्ही रोखली, अडीच वर्षात भाजपाच्या लोकांना एक नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदलाची भावना ठेवणारी लोकं नाहीत.

मविआ सरकारने 6-6 कोटी वाटले

ज्याकाही स्थगिती दिल्या त्यातील 70 टक्के स्थगित्या उचलल्या आहेत. ती स्ट्रक्चर यासाठी ठेवली आहे की शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळलेला नाही तिथे सहा सहा कोटी वाटले आहेत. हे पैसे आणायचे कुठून? असा संतप्त सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

फडणवीसांकडून मोदींनी म्हटलेल्या म्हणीचा उल्लेख

आमदणी अठ्ठणी, खर्चा रुपय्या अशा प्रकारचे अवस्था असेल तर तशाप्रकारे बजेट मंजूर होईल, म्हणत फडणवीसांनी पंतप्रधान मोदींकडून म्हटल्या जाणाऱ्या म्हणीचा उल्लेख केला. मविआ सरकारने जरी अन्याय केला असला तरी आम्ही आम्ही अन्याय करणार नाही. आवश्यकत्या स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे तरतुदी जास्त आहेत त्याठिकणच्या स्थगित्या ठेवल्या आहेत त्यावरही योग्य निर्णय लवकरचं घेतला जाईल. सत्ताधारी विरोधी असा भेदभाव ठेवण्यात येणार नाही. मागील सरकारमधील कशी सहा हजार कोटींची तरतुद वाटली याची माहिती सभागृहाला देतो, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.


खोके, बोके आणि ओके…, पायऱ्यांवर रंगलं विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये बॅनरयुद्ध

First Published on: December 20, 2022 12:09 PM
Exit mobile version