पूजा चव्हाणच्या आजीचा शिंदे – फडणवीस सरकारवर संताप, म्हणाल्या ‘संजय राठोडांची आरती करा…

पूजा चव्हाणच्या आजीचा शिंदे – फडणवीस सरकारवर संताप, म्हणाल्या ‘संजय राठोडांची आरती करा…

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर 39 दिवसांनी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 अशी एकूण 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे गटातील वादग्रस्त आमदार संजय राठोड यांनाही स्थान दिल्याने विरोधकांसह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. संजय राठोड हे पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडले होते. ज्यांनंतर त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र इतकं सगळं होऊनही संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने पूजा चव्हाण या तरुणीच्या आजी शांताबाई राठोड यांनी शिंदे फडणवीस सरकारवर संताप व्यक्त केला आहे. ‘संजय राठोडांची आरती करा म्हणजे त्यांना चांगलं वाटेल. अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केलं आहे.

शिवसेनेच्या घोषणेनंतरही काँग्रेसला हवंय विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद

आम्हाला अशी अपेक्षा होती की, या पक्षाकडून पूजा चव्हाणला खरोखरच न्याय मिळेल. पण काल झालेला मंत्रिमंडळाचा शपथविधी पाहून आता असं वाटत नाही. ज्या पक्षाने त्याला वाचवलं आणि (मंत्री म्हणून) स्थान दिलं, ही बाब दुर्दैवी आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि हा निर्णयही अपमानास्पद आहे.

एका मुलीची अब्रू काढून गर्भपात करुन तिचा खून केला जातो. स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की, हे कर ते कर. एवढं ऐकूनही संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो. शिंदे-फडणवीस सरकारने आरती करावी त्यांची, नाहीतर पूजा करावी म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल, अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट, कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय

संजय राठोडांना मंत्रीपद देणे म्हणजे महिलांचा अपमानच आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण असूनही पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही.पोलीस तुमचे आहेत. त्यामुळे ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता यांना माफ करणार नाही. संजय राठोड गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगारचं राहणार. ते खुनी आहे खुनीच राहणार, अशी टीका शांताबाई यांनी केली आहे.

दरम्यान सरकारकडे तुमची काय मागणी आहे यावर शांताबाई म्हणाल्या की, पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील.


शिवसेनेच्या आमदारांना कामकाज सल्लागार समितीवर घेण्याचं टाळलं – जयंत पाटील


First Published on: August 11, 2022 2:08 PM
Exit mobile version