महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

''ऑक्सिजन मशीन पुरवठा थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा दबाव'' शिवराज सिंह चौहानांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून राज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत सुमारे २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केले जाणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान ते लॉकडाऊन बाबात काही घोषणा करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोना रुग्ण वाढीमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, यवतमाळ, नागपूर, नाशिक याठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना आपली दहशत निर्माण करणार का?, अशी भीती अनेकांच्या मनात आहे.

दरम्यान, राज्याची चिंता वाढलीय आहे. एकट्या मुंबईतच कोरोना रुग्ण वाढीमध्ये तब्बल ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरात एकूण ८२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर डिसेंबरनंतर प्रथमच एवढी मोठी वाढ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना विषाणूचे ३ लाख १७ हजार ३१० रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ११ हजार ४३५ रूग्णांना आपला प्राण गमावावा लागला आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढीमागे हे असू शकत कारण

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागातील तापमानात घट झाली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढीमागे हे कारण असू शकतं, अशी माहिती वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. तसेच, कोरोना विषाणूच्या सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री कोणती घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.


हेही वाचा – पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन; बाहेर फिरण्यास बंदी


 

First Published on: February 21, 2021 1:34 PM
Exit mobile version