Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: पनवेल ग्रामपंचायत निवडणूकमध्ये भाजप नंबर वन!

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: पनवेल ग्रामपंचायत निवडणूकमध्ये भाजप नंबर वन!

ग्रामपंचायत निवडणूक पनवेलमध्ये भाजप नंबर वन!

पनवेल तालुक्यातील विविध ग्रामपंचतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेषत्त्वाने अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. एकूणच या निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.

गेल्या अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या पालीदेवद, वाजे, खानाव, ग्रामपंचायतीत भाजपने कमालीची कामगिरी करत बाजी मारली. त्यामुळे शेकापच्या गोटात खळबळ माजली आहे. विजयासाठी भाजपच्या त्या-त्या भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान भाजपमध्ये उत्साहाचे तर शेकाप व महाविकास आघाडीमध्ये नैराश्याचे वातावरण होते.

पनवेल विधानसभा मतदार संघातील १४ पैकी ०९ ग्रामपंचायत भाजपने जिंकल्या. आकुर्ली ग्रामपंचायत यापूर्वीच पूर्ण बिनविरोध जिंकली असून पाली देवद, उमरोली, वाजे, खानाव, वारदोली, केवाळे, वाकडी, खैरवाडी, ग्रामपंचायत भाजपने जिंकून विरोधकांना पराभवाची धूळ चारली.

पाली देवद ग्रामपंचायतीत चेतन पांडुरंग केणी, दिवेश भगत, पूनम भगत, प्राची अमित जाधव, पुष्पा पांडुरंग म्हसकर, ज्योती रविंद्र केणी, कविता पोपेटा, महेश पाटील, चंद्रकांत पोपेटा, योगिता पाटील हे निवडून आले असून अशोक पाटील आणि अनिता पाटील यापूर्वीच बिनविरोध विजयी आले आहेत. वाजे ग्रामपंचायतीत पदू नामदेव वाघ, काळी शाम कातकरी, अंजली राजेंद्र भालेकर, कमला किसन कातकरी, भारती शामकांत भालेकर, रेवन आत्माराम पाटील, मथुरा मदन पाटील, उमरोली ग्रामपंचायतीत रोशन शांताराम पोपटा, शुभांगी नरेश मढवी, अलका प्रकाश तांडेल, प्रितेश तुकाराम डांगरकर, कमला बळीराम मढवी, बेबी ठाकूर, श्वेता चंद्रकांत मढवी, किरण डांगरकर (बिनविरोध)मी रेश्मा पाटील (बिनविरोध), वारदोली ग्रामपंचायतीत राम पदू भवर, संगीता बाळू भूतांबरा, जानवी जितेंद्र बताले, दिनेश बाळाराम पाटील, हेमंत रघुनाथ तांडेल, सविता संतोष पाटील, अर्पिता अनंत पवार, खानाव ग्रामपंचायतीत बाळाराम कोंडू पाटील, जयश्री शशिकांत दिसले (दोन ठिकाणी), चंदा निलेश वारदे, हरिचंद्र भुऱ्या गोंधळी, निलम मनोहर अरिवले, केवाळे ग्रामपंचायतीत बारकी अंबो पारधी, रेणुका अशोक गायकर, कांचन परशुराम पालकर, करुणा रविंद्र गायकर, वलप ग्रामपंचायतीत नवनाथ महादू खुटारकर, ज्योत्स्ना राजेश पाटील, पाले बुद्रुक ग्रामपंचायतीत निलम गजानन भोईर, लक्ष्मण तुकाराम उलवेकर, सिद्धी संदीप तांडेल विजयी झाले. वाकडी ग्रामपंचायतीत ०९ पैकी ०६ तर खैरवाडी ग्रामपंचायतीत ०७ पैकी ०५ जागा जिंकून भाजपने वर्चस्व सिद्ध केले.

उरण विधानसभा मतदार संघातील व पनवेल तालुक्यातील सावळे, सांगुर्ली ग्रामपंचायतीत भाजपचा तसेच देवळोली ग्रामपंचायतीत भाजप व मित्रपक्षाच्या आघाडीने विजय मिळविला. सावळे ग्रामपंचायतीत सुनील माळी, रश्मी राम गाताडे, प्रशांत माळी, कांता कांबळे, सुरेखा कुरुंगळे, सतिश म्हसकर, प्रगती जांभुळकर, यांनी दणदणीत विजय मिळवून भाजपचा झेंडा फडकविला. सांगुर्ली ग्रामपंचायतीत पद्माकर कातकरी, सुवर्णा पाटील, वसंत पाटील, संतोष पारधी, निर्मला ठोकळ, शरद वांगीलकर यांनी विजय मिळवीत भाजपचा झेंडा फडकवला.

कोळखे ग्रामपंचायतीतीत भाजपच्या लीना राजेंद्र पाटील, सारिका राजेश सुरते, अपेक्षा जाधव, अशोक मुंढे विजयी झाले. पोसरी ग्रामपंचायतीत ०७ पैकी ०६ जागा जिंकून येथे शेकापच्या सत्तेला सुरुंग लावले.

शेकापचे नेते व माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील यांचा पुतण्या विघ्नेश पाटील यांचा नवनाथ महादू खुटारकर यांनी पराभव करून जोरदार धक्का दिला. तसेच साई ग्रामपंचायतीमधील माजी आमदार विवेक पाटील यांच्या कासारभाट गावात भाजपचे सुजित शंकर पाटील यांनी शेकाप उमेदवाराचा १३६ मतांनी दणदणीत पराभव केला.

First Published on: January 18, 2021 6:43 PM
Exit mobile version