Maharashtra Vacant Seats : राज्यातील विविध विभागातील 2 कोटी 44 लाखं पद रिक्त: या विभागात होणार लवकरच बंपर भरती

Maharashtra Vacant Seats : राज्यातील विविध विभागातील 2 कोटी 44 लाखं पद रिक्त: या विभागात होणार लवकरच बंपर भरती

महाराष्ट्रात विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या संख्येने रिक्त पद असल्याची माहिती ही माहिती अधिकारातून उघड झाली आहे. महाराष्ट्रात विविध सरकारी विभागातील तब्बल 2 कोटी 44 लाख पद रिक्त आहेत. तर जिल्हा परिषद आणि इतर विभागातही ही सर्व रिक्त पद आहेत. आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात या रिक्त पदांची आकडेवारी समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्त्याने प्रश्नात विचारले होते की, महाराष्ट्र सरकारी नोकऱ्यांअंतर्गत किती पदांची भरती भविष्यात होऊ शकते आणि सध्या किती पदं रिक्त आहेत.

दरम्यान माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये एकूण 10 लाख 70 हजार 840 पदांवर नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. त्यापैकी 8 लाख 26 हजार 435 पदांची भरती झाली असून 2 लाख 44 हजार 405 पद ही अद्याप रिक्त आहेत.

माहिती अधिकारी अनिल गलगली यांनी 11 मे रोजी महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत सर्व विभागातील मंजूर पदे आणि रिक्त पदं याच्या माहितीसाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी प्रशासनाने सरकारी विभागातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या रिक्त पदांचे तपशील दिले आहे.

कोणत्या विभागात किती पदे रिक्त

गृह विभागातील एकूण 2 लाख 92 हजार 820 ही मंजूर पदे असून यापैकी 46 हजार 851 पदं ही रिक्त आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातही 62 हजार 358 ही मंजूर पदे असून त्यापैकी 23 हजार 112 पदं रिक्त आहेत. दरम्यान इतर विभागातही मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील काही विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या सर्वाधिक असल्याचे या अहवालात समोर आलेय.


मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलताना किरीट सोमय्यांची जीभ घसरली, म्हणाले…

First Published on: May 27, 2022 12:50 PM
Exit mobile version