लॉकडाऊनला विरोध नाही पण वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा – चंद्रकांत पाटील

लॉकडाऊनला विरोध नाही पण वेगवेगळ्या घटकांचा विचार करावा – चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षिय बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनबाबत संकेत मिळाले आहेत. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लॉकडाऊन लावताना वेगवेगळ्या घटकांचा विचारा करावा, असं सूचवलं आहे. आजच्या बैठकीत भाजपने संपूर्ण लॉकडाऊनला सहकार्य करु, पण आधी राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करा अशी भूमिका मांडली.

बैठकीत सगळ्यात शेवटी निर्णय काही झाला नाही, पण मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक लॉकडाऊनची आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांना काय मदत करता येईल ही माझी मागणी अजित पवार यांनी मान्य केली. सोमवारी याबाबत अजित पवार निर्णय घेऊ असं म्हणाले. त्यांनी गरीब नागरिकांना एखादं पॅकेज जाहीर केलं पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचा विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नये.

दोन दिवसात मुख्यमंत्री विचार करुन निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. घरी बसवून शिवथाळीचे पॅकेट पाठवून देणार का घरात? पैसे नाही म्हणता आणि आमदारांना २ कोटी कसे देता? एका वेळी ७०० कोटी वापरायला मिळतील. १४ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन लावा म्हणणाऱ्या तात्याराव लहाणे यांचे काय जाताय. त्यांनी झोपडपट्टी मध्ये जाऊन गरिबांची अवस्था पहा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना राज्यातील आमदारांचा विकासनिधी २ कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना ५ हजार रुपये द्या, असं आवाहन केलं. तसंच राज्यातील गोरगरीब जनता, कामगार, हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, आजच्या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

तर जनतेचा उद्रेक होईल

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्य सरकारला दिला. जनभावनांचा विचार करूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जावा, अशी सूचनाही त्यांनी यांनी केली. सरकारने योजना तयार करून ती लोकांसमोर मांडावी. लोकांना मदत मिळणार की नाही हे समजू द्या. यावर आम्ही राजकारण बंद करतो, पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, असेही फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – मोठी बातमी! राज्यात दोन आठवडे लॉकडाऊन?; दोन दिवसांत निर्णय


 

First Published on: April 10, 2021 8:53 PM
Exit mobile version