पोलिसांकडून धरपकड सुरू, मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

पोलिसांकडून धरपकड सुरू, मनसैनिकांना पोलिसांकडून अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात दिलेल्या अल्टिमेटमनंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दादर या परिसरात संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली होती. मात्र, मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच या धावपळीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि कार्यकर्ते संतोष धुरी यांना पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. परंतु मनसे नेते संदीप देशपांडे आणि कार्यकर्ते संतोष धुरी यांनी पोलिसांना तुरी दिली. देशपांडे यांनी तिथून पळ काढला. त्यामुळे पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकले नाही.

संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात पोलिसांचा प्रयत्न फसला आहे. कारण पोलिसांनी ताब्यात घेताना संदीप देशपांडे यांनी पळ काढला. मात्र, साळवींना ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे आज मनसेचे नेते राज ठाकरे हे दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात काल मंगळवारपासून वेगवेगळया भागातून मनसैनिकांची धरपकड केली जातेय. मनसेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी खबरदारी म्हणून अनेकांना नोटीसा पाठवल्या होत्या. तर अनेक मनसैनिक भूमिगतही झाले होते. अशातच अजूनही राज्यातील वेगवेगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.


हेही वाचा : राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुन्हा तपासावेत – खासदार संजय राऊत


 

First Published on: May 4, 2022 1:07 PM
Exit mobile version